Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३३ त्यास पदच्युत करूं पहातात, तेव्हां राजा होणेंच गैर आहे असे कोणी ल गेल काय? कधीही झणणार नाहीं. तर राजा होण्याविषयी मनुष्याने उमेद धरून राज्यसंपादन करावें आणि शत्रूपासून अपाय होऊं नये झणूम अनेक शस्त्रास्त्रे आपले संग्रही ठेवून त्याचे योगाने आपल्या शत्रूंचा ना शकरावा. त्याचप्रमाणे परमेश्वरानें या जगामध्ये ज्या नानाविध वस्तु निर्माण केल्या आहेत त्या जरी क्षणिक व भ्रांतिमुलक आहेत, तथापि मनु व्यांनी त्याचा उपभोग घेऊं नये असाच इश्वरी संकेत आहे असे मानणे हा न्याय होणार नाहीं. गारोडी जादूचे वळाने अनेक पदार्थ उत्पन्न करतो. 'फुकमारूं मी लगाऊ' असें ह्मणून तो शेंकडो पदार्थ उत्पन्न करितोय नाहीसे करतो. आतां आपण ती सगळी जादू आहे असे जा नतों, त्याणें उत्पन्न केलेले पदार्थ पहातों, हातांत घेतों, ष खातों. जरी आपण त्या पदार्थाचा असा अनुभव घेत असतों, तथापि तें सर्व खोटे आहे असा आपले मनाचा पक्का निश्चय असतो, आतां ज्यादुचा तमाशा हा खोटा आहे ह्मणून तो करूं नये व पाहूं नये असें ह्मणतां येईल काय? तसेंच तो खोटा असल्या मुळे तो करणारास व पाहाणारास आपण मूर्ख झणतों काय? हा प्रकार मुलींच नाहीं. उलट अशा आादुकाराची प्रशंसा होते व तो पहाण्यांत प्रेक्षकांला आनंद होतो. याचप्रमाणे हा प्रपंच मिथ्या माहे असे वाटले ह्मणून त्याज विषयीं अनासक्ति उत्पन्न होणार नाहीं. तो मिथ्या आहे असे समजून त्यांत असणारे जाते सुख व आनंद पावतात आणि अज्ञानी लो कांस त्याचे मिथ्या न कळन ते फशी पडतात. या गोष्टी विषय विशेष खात्री होण्यास आमच्या मतें मयसभेचे उदाहरण बस आहे. या मयसभेची हकीकत सर्वांस माहित असेलच. या सभामंडपांत कारागिराने आपल्या चातुर्यांची सीमा केली होती. त्यांत त्याणें एक विलक्षण प्रकार केला होता. जमीनीवर घोटीव पाषाण बसवन असा चमत्कारिक देखाया केला होता की तो एक जलाशय आहे असा भास होत असे, नुसता भास नव्हे, पण