पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११९ हिरा ● अशो या विद्येची योग्यता असून सांप्रत तिजकडे लोकांचे दुर्लक्ष झाले आहे. जो विद्या पूर्वी मोठचा कुलीन व नामांकित घराण्यांत दृष्टीस पडत असे ती हल्लीं नोच लोकांमध्ये जाऊन चांगले लोकांचे तिरस्का राला पात्र झाली आहे. पण हे लोकांचे केवळ अज्ञान होय. केरांत टाकला तथापि तो आपल्या तेजानें मोउचा सार्वभौम राजाचे डोळे दिपविण्यास सोडणार नाहीं. तद्वत ही सद्विद्या नीच लोकांचे घरांत पडली आहे तथापि तेथूनही ती मोठ्या विद्वान व कुलोन पुरुषांचें चित्त आपणाकडे ओढून घेण्यास सोडोत नाहीं: नृत्यगायनादि कला अलीकडे निंद्य मानल्या जातात हा किती वेडेपणा आहे? पूर्वीतर स्त्रियांसही या कला मोठ्या आवडीने शिकवीत असत, विराटाकडे स्त्रियांस शिकविण्यास बृहन्नडेला ठेविली होती हें सबीस ठाऊक असेलच. परंतु अलीकडे याज- बद्दल लोकांची भलतीच समजत झाली. कचित गाणें, बादचें वाजविणे व नर्तनादिक दृष्टीस पडतात पण ते केवळ उदरनिर्वाचे व याचकपणाचे धंदे बनले आहेत. कुलीन, विद्वान, व संपन्न लोकांत याच्या अभ्या- साधी प्रवृति नाहीं गायला शिकल्याने मुलगा रंडीबाज होतो, तबला वाजविण्यास शिकल्यानें तबलजी होतो, व सारंगी बाजवूं लागल्यानें छाकटा होतो, अशी लोकांची वेडगळ समजूत झाली आहे. यामुळे ही विद्या तशा प्रतीचे लोकांतच कचित दृष्टीस पडते. आतां ही विद्या संपा दन करणारे लोक जे वर सांगितले ते श्रीमंत नसल्यामुळे पोटाचे नादीं लागतात, या योगानें तिचा पूर्ण अभ्यास होत नाहीं. खेरीज या देशांत परद्वीपस्थ व परधर्मी लोकांची राज्यसत्ता असल्यामुळे आणि त्या लोकांस या विद्येची असावी तशी अभिरुची नसल्यामुळे तिला कोणत्याह तऱ्हेनें राजाश्रयहि मिळत नाहीं. आणि श्रीमंत व विद्वान लोक तर आपल्यास तिचा वाराहि लागू देत नाहीत. पण ही गोष्ट शिक्षणाचे संबंधानें मात्र, बाकी ते त्या विधेस लुब्ध होत नाहीत असे नव्हे. दरमहा शेकडों रुपये खर्च करून आपले आश्रमते वेश्यादिकांस ठेवतात व ●