पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११८ यांपैकीं .. या स्वरशास्त्राची गोडी यात्राल वृद्धांना असन तें सर्वदेशांत व सर्व जातीतील लोकांत आहे. मनुष्य विद्वान असो किंवा मूर्ख असी, तसेंच तो सुधारलेल्या देशांतील असो किंवा एखाद्या जंगली मुलखांतला असो, त्यास या स्वरशास्त्राची गोडी असून खेरीज स्वत: त्याला कांहीं गातांनाहि येत असेल. भाषेमध्यें गद्य व पद्य असे दोन भेद आहेत. भाषेचे पद्य स्वरूप या संगीत शास्त्रांत मोडतें पद्यांत श्लोक, आर्या, अभंग, ओवी, कटिबंध, इत्यादि भेद आहेत. तसेंच या प्रत्येकांचे आणखी पोट भेद होऊन त्यांत मात्रादिकांचे नियम बांधले गेले आहेत, बत्या मीत्यर्थ छंदशास्त्रच बनले आहे. पद्य बहुधा चालीवर ह्मणजे संगीत शास्त्राचे नियमानें ह्मणण्याचा सांप्रदाय आहे. स्वरांचे निबंधा. वरून जे राग, रागिण्या वगैरे उत्पन्न झाले आहेत ते ह्मणून दाखविण्या करितां शब्द मालिका तयार करतात. त्या शब्द मालिकेस प्रस्तुत रूढीत चीज ह्मणतात. या शब्द समूहानें अनेक पधें झाली आहेत, त्यांत धृपद, ख्याल, टप्पा, प्रबंध, तराणा, पद, अष्टपढी, इत्यादि भेद आहेत. साधारणत: भाषेचें पद्यस्वरूप, सुरस व सुंदर असतें, त्यांत त्यास संगीत शास्त्राची अनुकूलता झाली झणजे तो शब्द समुदाय फार मधुर यातून चित्ताला आनंद होतो. संस्कृतांतील सर्व ग्रंथ बहुवा पद्यरूप आहेत. परमेश्वराची सर्व स्तोत्रें ही पद्यरूपांत असतात. पधें ही पाठ करण्यास व व ध्यानांत ठेवण्यास सुलभ असून खेरीज त्याचे योगानें मनरंजन होतें, मुख्यरापसून अज्ञानी प्राण्यासहि आनंद होतो. गाणें ह्मणू लागले झणजे लहान मूल रडत असले तर उगाच राहते. रानांतील धुरांचा कळप गुराख्यानें बाजविलेल्या पांत्र्याचा नाद ऐकून चारा खाण्याचे सोडून स्पस्य उभा राहतो, सारांश या स्वरशास्त्रानें मोहित न होणारा प्राणी फारच विरळा. या नादानें निर्जीय पदार्थानाही द्रव उत्पन्न झाल्याचे पुराणांत वर्णन आहे. G