पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ पासन जें कार्य साधावयाचें असेल तिकडे लक्ष दिले पाहिजे. पण कि त्येक मंडळीच क्रम तर अगदी उलट असतो. भजनाचे योगानें तंटे माजून दुफळचा होतात, त्यांत एक विशेष आश्चर्याची गोष्ट आमचे अनुमास आली आहे तो ही की, कांडी भजनी मंडळीने साधारण तंटचा वरुन एक देऊळच भजनास वर्ज केले. ज्यांचे भजन ऐकण्यास देवहि पात्र नाही त्या भजनी भक्तांस व त्यांच्या भक्तिमार्गास काय ह्मणावें हें आह्मास समजत नाहीं. अस्तु, तेव्हां प्रस्तुत नामसंकीर्तन हा जो ईश्वरप्रतीचा सरळ व सोपा मार्ग आहे त्याचा असा चिवडा न करतां त्यांनी हेतु मनांत धरून तदनुरूप वागणें में मनुष्यास योग्य होय.