पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११ एक कर्मणुकीचा मार्ग असून दुराचरणांत व लोकांच्या उठाठेवी करण्यांत जो काळ घालवण्याचा त्या पेक्षा हे भजन बरें, पण नवविधा भक्ति मार्गात जे नामसंकीर्तन सांगितलें व व्यापासून अंतःकरणाची शुद्धि आणि भगवत्प्राप्ति होते तें हें नव्हे. ज्या प्रमाणे ख्रिस्ती लोकांतील प्रार्थना व मूर्तिपूजकांची पूजा हो दांभिक वनली आहे त्याच प्रमाणे प्रस्तुत भजनी भक्त मंडळीचे नामसंकीर्तनाचा बोजवार झाला आहे. आतां या मंडळींत सर्वच दांभिक असतात असे नाही, जो ज्ञानी आहे तो त्यांतील खरें तथ्य जणून वर्तत असतो. पण असे थोडे. जो जो ज्ञानप्राति जास्त होऊ लागते, व ईश्वराचे अलौकिक सत्तेविषयीं मनुष्या स अनुभव घडूं लागतो तसे है दांभिक मार्ग कमी होत जातात. लोकांमध्ये प्रार्थना, पूजा, व भजन, यांचें दंभ न माजवणारा ज्ञानी, आणि रात्रंदिवस या दांभिकमार्गाने टाहो फोडणारा मजक यांचे मध्यें जानी श्रेष्ठ असून ईश्वरप्राप्तीला योग्य होय. या लिहिण्या वरून लोकांनी एकदम भक्तिमार्ग सोडून द्यावे असा अर्थ नाहीं. कारण, , आश्रम घरमा प्रमाणे जी नियमित कर्मे करावयाची ती केलींच पाहिजेत. मात्र त्यांत सारासार विचार करून ज्ञानप्राप्तीकडे विशेष लक्ष द्यावें. मनुष्यास जशी ज्ञानप्राप्ति विशेष होऊं लागते तशी त्याची कआपोआप लागतात. नवविधा भक्तिमार्ग सांगण्याचे कारण तरी हेंच आहे. एका मार्गानें ईश्वराचे स्वरूपाचा बोच झाला झणजे दुसय्याने त्याचे प्राप्तीची इच्छा करावी, आणि अशानें जाऊं लागलें जे पूर्वीचा मार्ग आपोआप सुटतो. ईश्वराचें भजन चार मंडळी बरोबर घेऊन आणि त्यांत मनोरंजनाचाहि कांहीं भाग धरून केले तथापि ते अगदी फुकट जाईल असे नाहीं, ह्मणून वर सांगितलेंच आहे. पण त्या भजन करण ज्यांनी जन्मभर हातांत तंबुरा घरून ओरडतच बसं नये, या भजनाचा उद्देश काय देंगी मनांत आणून न्याज