Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुष्कळ विचार केला असल्यामुळे त्याणी लिहून ठेवलेले ग्रंथाचे अवलो कनही समग्र होत नाही, मग जास्त रागदाच्या उत्पन्न करण्याचे लांबच. असो, स्वरांच्या कांहीं नियमित जुळणीला राग ह्मणतात ह्मणून घर सांगितले त्यांतील मुख्य राग खाली लिहिल्या प्रमाणे:- १ भैरव २ पंचम - ३ नाट ४ मल्हार ६ देशाव गौडमालव - या खेरीज याच्या पोटीं - आनंद बहिरवी, कल्याण, कानडा, काफी कांबाब, कालंगडा, केदार, खट, गांधार, गारा, गुजराथी, गुणकारी, गौडी, जंगल, जयजयवंती, जोगी, झिंधुटी, तांडी, देस, नाट, परज, पिलू, पूर्वी, यसंत, बहिरवी, बिअल, बिलावल, व्याहाग, भौपाली, मल्हार, मालकांस, माळवा, सुलतानी, यमन, रामकली, ललत, लिलारी, वराटी, विभाग, शंकरा, श्री, शंकराभरण, सारंग, सिंदी, सुवा, सारेट, सोहनी इत्यादि भेद आहेत. या शिराय यांचेहि आणखी अनेक पोटभेद आहेत पांत राग, रागिण्या, जिल्हे, बहार वगैरे अनेक भेद आहेत. असो तेव्हां हें नादत्रह्म अरों विस्तृत झाले आहे. अशा तऱ्हेनें या स्वर शाखावर अनेक विचार व अनेक ग्रंथ झाले असून प्रस्तुत लोकांचे अज्ञानाने त्या शास्त्रांत फारशी कोणार्थी गतीही नाहीं. या गायनाला आपल्या प्राचीन ऋषींनी वेदात गणलें आहे गायन: पंचमी वेदः' असी व्यासोक्ति असल्याबद्दल लोकांस माहीत असतां या विद्येविषयीं अज्ञानामुळे अशी समजूत झाली आहे की हो विद्या मुळी आपलीच नाहीं असें लोक ह्यणतात. मूळ गाण्याची विद्या मुसलमानांची असा लोकांचा वेडगळ समज झाला आहे. सारांश, ही विद्या अति उदृष्ट व मनाला उल्हास देणारी असून तिजबद्दल लोकांची विपरीत बुडी झाली. मनुष्य मोठे श्रम करीत असतांहि या स्वरशास्त्रा 'पासून त्याला विश्रांति मिळून काम करण्याची उमेद येते. याचा अनुभव (