पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जोरावर आपल्या मर्दानी आवाजानेंहि लोकांची मनें संतोषित कारतात एखाद्याचा आवाज फार कर्कश असतो, व एखाद्याचा मधुर असतो. गवयाचा स्वर मधुर नसणें ही त्याच्या विद्येला मोठी उणीवच आहे. फक्त विद्येच्या योगाने होणारें समाधान घोडक्यांचें, मोठे विद्वांन गवय्येहि वारांगनांच्या स्वरमाधुर्यास लुठव होतात. संगित शास्त्राचा मूळ पाया स्वर ह्मणून वर सांगितले आहे. शास्त्र कारांनी या स्वरांचे भेद सात केले आहेत. ह्मणजे पाहिजे तो स्वर असला तथापि तो या सातां पैकीं एकांत येतो. प्रस्तुत रूढीमध्ये त्या स्वरांची नावें आली आहेत ती केवळ अपभ्रंशाने आली आहेत, असो मुख्य सप्तस्बर पुढें लिहिल्या प्रमाणे मूळ स्वर अपभ्रंश १ पडूज २ ऋषम ३ गांधार १ खरज २ रीखब ३ गंधार ४ मध्यम ५ पंजम ६ धैवत ७ नीषाद ११५ ३ ग ४ म ५ प ६ ध ७ नीखाद ७ नो या प्रमाणें स्वरांचे नियमित वर्ग केल्यामुळे त्यांची योजना करण्यास फार उपयोग झाला. स्वरांच्या नियमित योजनेलाच राग असें ह्मणतात. बुदबळांचा पट चौसष्ट घरांचा असून जसा खेळतांना प्रत्येक डाव निराळा होतो. व या प्रमाणे लक्षावधी डाव झाले तथापि माहितगार आहे तो याहूनहि एखादा निराळा डाव काहूं शकेल. तसे हे स्वर जरी सातच आहेत तथापि त्यांचे निरनिराळे योजनेने अनेक राग उत्पन्न झाले आहेत, व त्या शास्त्रांतील विद्वान स्वराभिज्ञ पुरुष आणखाडि पाहिजेत तेवढे राग उत्पन्न करतील. पण प्राचीन विद्वान पुरुषांनी याचा ४ मधम ५ पंचम • ६ धैवत संक्षेप १ सा २री