पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११४ मनुष्यास ईश्वराविषय ज्ञान उत्पन्न होऊन त्याचा कांहीं साक्षात्कार घडला ह्यणजे जशी सर्व तंद्री तिकडेसच लागते, व परमेश्वराचे मारा धनेंत आणि ब्रह्मसाक्षात्कारांत त्याचे चित्त व्यग्र होतें, तसाच या नाद ब्रह्माचा महिमा आहे. मधुर नाद कानीं अःला ह्मणजे मनुष्याचे चित्त कसेंही बायरलेलें कां असे ना, लगेच तें शांत व स्थिर होते. या ब्रह्मा चा साक्षात्कार चित्ताला घडला ह्मणजे मनुष्यास समाधान वाटतें, मना ला उल्हास होतो, व कंटाळा आणि त्रास जाऊन विश्रांति व सुख वाटतें ऐहिक पीडेने दगदगलेल्या मनुष्याच्या चित्तवृति संतोषित करण्यास या सारखें दुसरें रसायणच नाहीं. गाण्याने अंतरात्मा सुप्रसन्न होतो. पूर्व युगांत गायनादिकांचे योगानें परमेश्वराला त्याचे भक्तांनी वश केल्याची उदाहरणें पुराणांत आहेत. या विद्येचा अंगीकार मोठमोठे लोक करीत. रावणानें गायनाचे योगानें शंकराला सुप्रसन्न करून घेऊन आत्मलिंग स पादिलें, देवऋषी जो नारद त्याची गायनाविषयी प्रसिद्धच आहे गंधर्वा दिक सुरगण हे गायनांत निष्णात असल्याबद्दल पुराणांत सांगितलेले आहे. आप्सरांनी नृत्यगायनादिकाचे निपुणतेने विश्वामित्रासारख्या तपोनिष्ठ मुनी सहि लुब्ध करून वानरूपानें आपले पाठीस लाविले, आतां या गोष्टी पुराणांतच झाल्या. अलीकडे देखील याचा अनुभव लोकांना आहे. सदा चारी व सद्गुणी पुरुष केवळ गायनास लुब्ध होऊन वेश्यालंपट झाल्या ची उदाहरणे अनेक मिळतील, बायकांचा स्वर पुरुषांपेक्षां स्वभावतः मधुर असतो, यामुळे त्यांचे गाण्यानें चित्त मोहित होतें. लहानपणीं ह्मणजे बाल्य दशेत स्त्रिया व पुरुष यांचा स्वर सारखाच असतो, परंतु पुढे वयांत आल्यावर पुरुषाचा आवाज थोडा घोगरा होतो हा पालट बाय कांचे आवाजांत होत नाहीं. संगीत शास्त्राचा जो मूळ पाया, तो स्वरा यर असल्यामुळे पुरुषांपेक्षां बायकांचे गाणे स्वाभाविक गोड लागतें त्या मध्ये त्यांस संगीतशास्त्राचें विशेष ज्ञान असेल तर फारच मजा उडते. गायन विद्येमध्यें निपूण असे कित्येक प्रसिद्ध गययादि विद्वत्तेचे