Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१११ नादब्रह्म यथा नयंति रागास्ते नरं गायनकोविदं || तथा नयंति कैलासो न गंगा न सरस्वती ॥ जेथे ध्वनि उतन्न होतो तेथें या ब्रह्मसाक्षात्काराचा अनुभव आहे च. मनुष्याच्या व पशुपक्षादिकांच्या मुखांतून निघणारे शब्द, घातूंच्या तत्वादिकांपासून उत्पन्न होणारा ध्वनि, आणि वृक्षगट किंवा गिरि गहरां मध्ये बायूचे संचारा पासून उत्पन्न होणारा ध्वनि, हे सर्व नाद होत. यांत कांहीं ध्वनि मधुर असतात आणि कांहीं कर्कश असतात. म नुष्यांनी आपले ज्ञानानें अनेक विद्यांचा व वस्तूंचा शोध करून त्यांचा संगतवार संग्रह करून त्याजवर अनेक ग्रंथ केले, तद्वत या नादविद्येवर हि त्यांणी बहुत शोध केला. आमच्या देशांत सर्व विद्यां प्रमाणे या वि द्येवरह प्राचीन ऋषींनी अनेक विचार करून ग्रंथ करून ठेविले आहेत. गायन, नृत्य, आणि वाद्य हो या नादब्रह्माची अधिष्ठान होत, झणजे पूर्वो त स्वरांची रचना करून ते कर्णेद्रियास प्रिय घाटावे व त्या योगानें मं तःकरणास आनंद व्हावा अशी जी स्वर पद्धति त्यास संगीत ह्मणतात. संगीत शास्त्रा मध्ये पूर्वी पुष्कळ लोक निपुण असत. सुम्बर हे मनुष्यास फार प्रिय आहेत. यामुळे या शास्त्रा पासून मनुष्याला जेवढा आनंद होती तेवढा इतर कोणत्या गोष्टी पासून होत नाहीं. न्याय, व्याकरण, मीमांसा इत्यादि शास्त्रे विद्वानांची विद्वत्ता दाखविणारी व विशेष करून विद्वानांस प्रिय असतात. पण हें संगीत शास्त्र सर्व प्रिय होय. या शास्त्रानें ज्ञानी व आज्ञानी हे सर्व संतोषित होतात. फार तर काय, सर्व पशु पक्षादिकांसहि या शास्त्रा पासून आनंद होतो. या शास्त्राचा मूळ पाया स्वर होत. असे समजा कीं, कांहीं महा पंडित एके ठिकाणी व्याक रण शास्त्रायर भवति न भवति करीत आहेत. आतां त्या ठिकाणीं अवि द्वारा मनुष्याचें मन तर रमणार नाहींच, पण न्याय मीमांसादि