पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११० F तेव्हां याजवरून पूर्वयुगांत व प्रस्तुत काळांत लोकांचें ऐहिक स्थितीं त किती बरें अंतर दिसतें? त्यांतून ही स्थिति उत्तरोतर कोणत्या थरास जाईल याचा विचार करूं लागळे झणजे फारच वाईट वाटतें. लोकां मध्ये कोणताही कामाविषयों उत्साह बुद्धी दिसत नाही, त्यांची सर्व उमेद खचल्यासारखी दिसते, विपन्न स्थितीत राहून माझा मारीत बसणें त्यां सजा ते आवडत नाहीं तथापि त्या पासून आपली सुटका करून घेण्या चोयांची इच्छा दिसत नाहीं, सरासरी जो आपला निर्वाह करतो तो सु खी समजला जातो, हजार पांचशे रुपये जवळ असले झणजे तो पैसे वाला ठरतो, दाहापांच मनुष्ये पदरीं असली झणजे तो श्रीमंतांत मोडतो, चार गांवांची वतनदारी असलो झणजे इनामदारांत आणि जादा गीरदारांत मोडला जातो, लोकांचे नफा नुकसानाची थोडी सत्ता हातां तमसन दाहा बीस हजार रयत आणि शेपन्नास घोडर्डी विडी संग्रहीं अ सलीं ह्मणजे तो राजा मानला जातो, मिळून सर्व लोक जसे अल्पसंतोषी आणि दुसऱ्याचें ऐश्वर्य व हिकमत पाहून आश्चर्य करणारे झाले आहेत. स्यातां हा प्रस्तुत काळचा झणजे कलियुगाचा संबंध फक्त आपले हिंदुस्था न देशासन लागू करता येईल हे सांगावयास नको. कारण येकतर ही युगपरंपरा हिंदुलोकांनी मानलेली असून त्याचा अनुभव प्रस्तुत त्यांसच आहे. यांची पूर्व युगांतील उत्तम स्थिती परद्वोपस्थांनी हिरापून घेतली आहे. घोडे, गाडचा, तारायंत्रें, विमानें, अग्निरथ, इत्यादिकांनी कलियुगाचा अंमल बसू लागला तेव्हां या देशांत राहण्याचे राजीनामे दिले व देत आहेत. मिळून प्रस्तुतकाळी लोकांची स्थिति दीन, तेजहीन, व वि पन्न झाली आहे तेव्हां ते यांतुन पार पडून उत्तम स्थितीत येतील तो सुद्रीन समजावयाचा.