१० तेव्हां याजवरून काय समजावयाचें कीं, ज्ञानावांचन भक्तिमार्ग हे ध्यर्थ आहेत. नामसंकीर्तनाला ज्ञानाची आवश्यकता आहे, आतां नुसते ‘हरी हरी' जरी केवळ फुकट जाणार नाहीं तथापि तें भारवाहका प्रमाणे होय. बैलाचे पाठीवर जशा साखरेच्या गोणी तद्वत अज्ञानी मनुष्यास हे मार्ग आहेत. त्यांत इतकेंच कीं, लांकडाच्या मोळ्या किया शेणाच्या गोणी लादण्यानें जी खटे पडतील ती साखरपासून पडणार नाहींत. असो तेव्हां या नामसंकीर्तनास ज्ञानादिकांची जरूर आहे. " व्यजितनाम यदो भलत्या मिसें सकळ पातक भस्म करीतसे" हें जरी खरें आहे, तथापि ज्ञाना यांचन विंचरलेल्या कापसा सारखी स्थिती होणार नाही. साधारण व्यवहारिक गोष्टी या देखील जर जाना वांचून सिद्धीस जात नाहींत, तर मग प्रत्यक्ष ईश्वर प्राप्तीला तर तें किती अवश्य आहे याचा विचार करणे फारसे अवघड नाही. परंतु अलीकडे या नामसंकीर्तनाचीहि इतर पूजादि भक्तिमार्गा प्रमाणेंच दुर्दशा झाली आहे. ह्मणजे त्याजबद्दल लोकांच्या भलभलत्याच समजुती होऊन त्या नामसंकीर्तनाचे रूपांतर झालेले दिसतें. ज्याप्रमाणे यज्ञयागादिक करावया चीं असली जे सुची, या, यज्ञमंडप, होमकुंडें, ऋविज, यज्ञपश, वेदी, इत्यादिक सामान लागते त्याचप्रमाणे या नामसंकीर्तनाचीहि स्थिति झाली आहे. या नामसंकर्तिनासहि, टाळ, तंदुरा, ढोलकी, चिप कचा, चाळ, नाचणारे व गवई इत्यादि सर्व सरमजाम पाहिजे. यामध्यें आणखी सप्ताह बाया, गैरेनियमीत व वार्षिक प्रकार उत्पन्न होऊन सर्व दम माजून गेले आहे. ईश्वराचें नाव घेण्याचा उद्देश या भजनवाल्या मंडळींत थोडक्यांनाच असेल. 'ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम " असा जप घरून घटका घटका ओरडावें व नीट तालावर आणि सुस्वर गाऊन पायांत चाळ बांधून नाच्या पन्या सारखें नाचायें यास नामसं कीर्तन असे ज्ञानी आहे तो ह्मणणार नाहीं. आतां इतकेंच की, हा
पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/११
Appearance