Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०६ . असा निश्चय करून त्याणें वामनाचे हातावर दानोदक सोडले. पुढे वामनानें दोन पायानें पृथिव्याकाशादि व्यापून तिसरा पाय ठेवण्यास जागा मागितली तेव्हां बलीने आपले मस्तकावर तो देण्यास सांगितला. असो, तेव्हां तात्पर्य काय की आशा पुरुषांनीच खरोखर प्रपंच साधून परमार्थदि साधला असें ह्मणावें लागतें. ज्याणे आपल्या पराक्रमानें सार्थ मौमपद मिळवत संपूर्ण राजांस व देवांस जर्जर केले त्या प्रत्यक्ष आपला शत्रु मागण्यास आला असतां त्याची इच्छा तृप्त केली तेव्हां त्याची ध न्यता किती वर्णन करावी? ते आपल्या पराक्रमानें अनेक प्रकारचें ऐश्वर्य संपादून औदार्थाने त्याचा विनियोग करीत. कर्णानें उदारपणानें आपले व्यांगांतील कचच दिलें, शिबिराजानें यःकश्चित कपोताचे रक्षणार्थ आप ल्या देहाचें मांस दिलें. श्रियाला प्रत्यक्ष आपल्या एकुलत्या लाडक्या मुलाचे मांस यतीस दिलें. असो, तेव्हां तात्पर्य काय की पूर्व युगामध्ये लोक असे उदार असत. आतां कोणी ह्मणेल की हल्लीं तसे उदार पुरुष नाहींत की काय? हल्लींहि तसे पुरुष आपले दृष्टीस पडतात, पण त्यांचे औदार्याचें वास्तविक चीज होण्यास अनुकूल असे जे दुसरे पर कनादि गुण ते हल्ली लोकांचे आंगी नसल्यामुळे व त्याविषयी लोकांची विशेष इ च्छाहि नसल्यामुळे त्यांचें तें औदार्य विधया स्त्रियेचे सौंदर्यासारखे दिसते. कवीच्या वागविलासाचें चीज रसिक ज्ञात्यांच्या संगती बांचन होत नाहीं, तरुणांच्या हग्विलासाची सार्थकता अनुरूप भर्त्याच्या सहवासा यांचून होत नाहीं, तद्वत महत्वाकांक्षा आणि पराक्रम हे आंगीं असल्या यांचन औदार्याचेंहि चीज होत नाहीं. असे समजा कीं, आरश्यांतील एकांत वासांत राहणारा एक जटेली- ज्याचे जवळ फाटकी लंगोटी आणि फुटका तुवा या यांचन दुसरीकांही संपत नाहीं – तो मोठा उदार आहे. पण त्याने आपले औदार्याने लोकांस संतोषित कसे करावे? कोरडी ठणठणीत झालेली एबादी नदी असते तिचा लोकांना जितका उपयोग तितकाच वरील प्रकारच्या औदार्य संपन्न जटेलीवुर्गा पासून -