पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०३ ऐहिक संबंधानें प्रस्तुतकाळचे लोकाची स्थिति. या पुस्तकाचे मागील अंकांत कलियुगाचे संबंधाने काही विचार लि हून वाचकांस सादर केलेले आहेत. प्रकृत विवेचनाचे संबंधाने आह्मी दो न भाग केले होते. एक ऐडिक सबंधानें व दुसरा पारमार्थिक संबंधानें. यां पैकी पारमार्थिक संबंधाचा भाग तेच वेळी पुरा करून ऐडिक संबंधा ने विचार करण्या विषयीं याचकांस अभिवचन दिले होते त्या प्रमाणे प्रकृ त विषयावर आज चार शब्द लिहूं. ● प्रस्तुत काल झणजे कलियुगांतील काल है मागील पिवेचनाचे धोरणावरून वरून वाचकांचे लक्षांत येईलव तसेंच या काळचे लोकांचे स्थिती विषयीं विचार करतांना मागील तीन युगां मध्ये लोकांची ऐहिक स्थिती कशी होती हेंहि पाहिले पाहिजे, याचा विचार करण्यायें सावन झवले झणजे ऐतिहासिक पौराणिक अशा कथा. आतां या ऐहिक स्थितिवांत लोकांचे आचार, त्यांची गह स्थिती, त्यांचा पराक्रम, त्यांचे विवाहादि संस्कार, त्यांचा अभिमान, त्यां ची बंधुप्रीती, त्यांच्यांतोल रीती भातो, आणि देशाविषयीं अभिमान इत्यादि गोष्टींचा विचार केला पाहिजे. हे विचार करूं लागलें झणजे पूर्वो त तीन युगांतील लोकांपेक्षां या कलि युगांतील लोकांची स्थिति फारच कनिष्ट य शोचनीय आहे असें ह्मणावें लागतें. पर्वीचे लोकांमध्ये ज्याप्रणे पराक्रम, धैर्य, स्वदेशाभिमान होता तसा आतां मुळींच दृष्टीस पडत नाहीं. आपल्या दखत आपल्या देशबांधवांची आतसोयत्यांची आणि आपली माता व स्त्रियांची मानहानी व उपमर्द होत असल्यास तो पर्व युगामध्ये कोणास खपत नसे. तसेंच त्या वेळचे लोकांचे आंगीं महत्वा कांक्षा फार असे. लोकांतील रिती भाती व आचार हे सुखावह अ.णि शरीर व मन यांस हितकारक असत. लोक शरीगनें फार सुदृढ आणि