पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तेव्हां यावरून हे लक्षांत ठेवले पाहिजे की, अशा या दांभिक भक्तनि ईश्वराची प्राप्ती न होतां मनुष्य खरोखर अयोगतीस जाईल. ईश्वरभ- क्तीचे संबंधांत अहंता व दुरभिमान नष्ट झाला पाहिजे. ईश्वर भतीला खरोखर अंतःकरणांतील प्रेम पाहिजे. एका कवीनें झवले आहे. - - १०२ नेत्र झांकोनियां काय जपतोसी । जंत्र नाहीं मानसीं प्रेमभाव || मंत्र तंत्र कांहीं करिसी जडीबुटी । तेणें मतसृष्टी पावशील || येणे पाप अंगी घेतोसी जडून । नेणसी में धर्म काय आहे ॥ वर जे जुलमाचे आणि अनतीचे प्रकार सांगितले ते केवळ मनुष्या च्या अहंपणाचेच होत. ऐडिक संबंधानें आपला हेतु तडीस जावा व लोकांनी आपल्या ह्मणग्या प्रमाणें चालायें ह्मणून धूर्त लोक आपले त्यांत ईश्वराचा संबंध दाखवून त्याचे योगानें अज्ञानी लोकांचा समुदाय आपले पक्षास मिळवितात. पण अशा या दुरभिमानानें आणि दमानें ते लोकांस ईश्वराकडे पोचविण्यास नर समर्थ होत नाहीतच, पण उलट आपले प्रमाणे सर्व दुनियेसाह ते अयोगतीस नेण्यास कारणी होतात, ज्याचे योगानें अत्मसाक्षात्कार घडेल तीच खरोबर भक्ति होय. बाकीचे सर्व मार्ग दांभिक आणि अज्ञानपिणाचे समजावे. मनुष्यानें सार्वकाळ हीच इच्छा धरात्री- - स्वतत्व हृदया कळो दुरभिमान सारा गो || पुन्हा न मन हे मी दुरित आत्मबोधे जो ॥