पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.१०१ आपले भक्तांस लोडून देतो आणि बाकीचे लोकांस तो बाहेर रखडत ठेपतो. मुसलमान लोकाह पैगंबराबद्दल असेच समजतात. त्यांच्या समजुती प्रमाणे चालणारे लोक तेवढेच कायते वैगंबराचे भक्त हणून ईश्वरातीस योग्य आणि बाकीचे सगळे ते पापी. आतां वास्तविक पाहू लागले असतां हीं सर्व मतें दांभिक होत. हे केवळ लोकांचे आग्रह आहेत. लोक अभिमानाला पडून ज्या प्रमाणे ऐहिक संबंधांत ह्मणजे विषयादिकांत स्वात्मत्य मिरवितात व सर्वकाळ आपलीच थोरवी लोकां मध्ये व्हावी ह्मणून यत्न करितात, तोच प्रकार या अनेक पंथांत आणि धर्मात झाला आहे. ज्याचें मन शुद्ध नमन ज्यांस जगामध्ये केवळ दंभ माजवावयाचें असतें त्यास सर्वच मार्ग खोटे दिसतात. बाकी ईश्वर सर्वांचा येऊच आहे. पण दुरभिमानानें अंध झालेले मनुष्यास तो दिसत नाहीं. एका कवीने झटले आहे. आंवळचासी जन अपधेची आंबळे || आपणासी डोळे दृश्य नाहीं || रोगीयासी विषतुल्य तें मिष्टान्न || तोंडासी कारण चवी नाहीं ॥ तुका ह्मणे शुद्ध नाहीं जो आपण || तथा त्रिभुवन अवधें खोटें ।। तेव्हां एकंदरीत वरील सर्व दांभिक प्रकार सुरू होण्याचें वारण लोकांचा मत्सर व आग्रह होय, तेव्हां असे आग्रहाचे मार्ग ईश्वर प्राप्तीला कसे अनुकूल होतील? सर्व पंथांतील व सर्व धर्मातील लोकांना ईश्वर येकस आहे. ईश्वराकडे अनेक पंथ व मतें मुलींच नाहीत. लोकां नीं आग्रहास पडून आणि अभिमान वरून केवळ आपली प्रतिष्ठा आ. णि लौकिक होण्या करितांच वरील सर्व दांभिकभक्तीचे प्रकार उत्पन्न केले आहेत. आतां अभिमानानें प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणाचे का भिन्न भिन्न होतात, तेव्हां त्याची मतेंहि अर्थात भिन्नच असावयाची.