पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहे तो मोठी चकचकीत गारगोटी दृष्टीस पडली झणून त्यास हिरा झणेल काय? खोटें मोंतो दिसण्यांत मोठे पाणीदार व गोळदार असते तें मोलाला चढते काय? तद्वत नश्वर जे विषयादिक त्यांस ज्ञानी आहे तो मुलणार नाहीं. स्वामींची वृत्तीहि अशीच होती. असो, दुसरे दिवशीं स्वामींनीं जातांना बरोबर काही कापूस घेतला. त्या पैकी कांहीं तशाच गांठी होत्या व कांहीं चांगला विचरून स्वच्छ केला होता. स्वामी वेश्येचे घराशी गेले तो ती वाटच पहात होती. तो स्वामीस माडीवर घेऊन गेली व कालचे प्रश्नाचे उत्तर काय तें सांगावें ह्मणून विनंति केली. स्वामींनी तिच्या पुढे तो कापूस टाकला, पण त्यापासून तिला कांहीं बोध होईना. तेव्हां स्वामींनी तिला दिवा घेऊन येण्या विषयी सांगितले व तो त्या गांडीच्या कापसास लावला पण तो चांगला पेटेना. धुमसत बुमसत जळं लागला, पुढे त्या विंचरून लख्ख केले ल्या कापसास लावतांच तो भरकन जळून गेला. नंतर त्यांणी त्या चे ईयला सांगितले की, गंगास्नानानें व काशीसाने आपण उभयतांहि मुक्तीस जाणार हें खरें, पण विषयोपभोगापासन ज्याचें चित मलीन झाले असेल तो या गांठीच्या कापसा प्रमाणे अनेक जन्म घिरट्या घाल न शेवटीं गेला तर तडीस जाईल नाहींपेक्षा मध्येच पिझन जो ईल. पण पिंचरलेला कापूस अग्निस्र्श होतांच जसा अग्नीरूप. बनला,) तद्वत शुद्धाचरणानें ज्याची चित्तशुद्धी झाली असते व विषयादि कचरा काढून टाकून ज्याचें अंतकरण शुद्ध झाले असते, त्यास भगवदनुग्रहाचा लाभ होतांच तो तद्रूप बनुन जातो. तेव्हां आतां तूंच सांग की, तुझ्या संग तीनें मी आपलें चित्त मलीन करावें, किंवा विशेष शुद्धीचा मार्ग घरावा? स्वामींच्या मार्मिक उपदेशाने त्या मेइयेला उपरती होऊन लज्जा है उत्पन्न झाली व हाच आपला गुरु असे जाणून तिण स्वामींचे चरण घरले, आणि त्या दिवसापासून ती सन्मार्गाने वागू लागली.