Jump to content

पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. महाराष्ट्रांतील मोरया देव व इतर साधुसंत यांची ज्याप्रमाणें या बाबतींत अनुमति घेतली त्याप्रमाणें रामदासांचीहि घेतली होती असें वर्णन केले आहे. १ १६७८ मध्ये शिवाजी रामदासास भेटावयास गेले होते. तेव्हां राम- दासांनी महाराजांस लोक जो 'जोहार' करतात त्या ऐवज 'राम राम म्हणत जावें असें म्हटलें. तेव्हांपासून रामरामाची पद्धति सुरू झाली. याच •प्रसंगी शिवाजीनें रामदासांस परळी किल्ल्यावर रहाण्यास येण्यास विनंति केली. त्या वेळी रामदासांनीं चाफळचे रामजीचे उत्साहाचा बंदोबस्त करावा असें शिवाजीस सांगितले व त्यानें चाफळच्या मठास गांव इनाम करून दिलें. इतक्याच दोन तीन प्रसंगाचें चिटणिसांनी आपल्या बखरींत वर्णन केले आहे. हनुमान स्वामीच्या बखरींत रामदास शिवाजीच्या विनंतीवरून १६५० मध्यें परळीस राहावयास गेले असे वर्णन आहे. अर्थात् हे विधान ऐतिहासिकदृष्टचा खोटें (कारण शिवाजीच्या सर्व बखरींप्रमाणें परळी किल्ला चंदनवंदन व साताऱ्या किल्याबरोबरच १६७३ मध्ये शिवाजीच्या ताव्यांत आला) ह्मणून चिटणीसानीं आपल्या बखरींतून वगळले आहे व ऐतिहा सिक गोष्टींशी जुळे अशा तऱ्हेनेंच रामदासांच्या सज्जनगडनिवासाची हकीकत दिली आहे. अफजूलखानाच्या वधानंतर शिवाजीमहाराज रामदासांस परळीस भेटा- वयास गेले व त्या वेळी त्यांनीं कांहीं गांव इनाम करून दिले ही आख्या- यिका; त्याचप्रमाणें शिवाजीनें रामदासांस राज्यदान केल्याची आख्या- यिका या विश्वसनीय नाहीत म्हणून चिटणिसांना सोडून दिल्या असा- व्यात. यावरून चिटणिसांनीं शिवाजीची बखर लिहितांना बरीच ऐतिहा- सिक दृष्टि ठेविली होती असे दिसतें. अर्थात् अशी दृष्टि आपल्या आराध्य दैवताचें देव्हारें माजविण्याकरितां लिहिलेल्या हनुमानस्वामींच्या बखरींत नाहीं हैं उघड आहे. त्यांतील किती तरी गोष्टी अशक्य असंभाव्य व ऐतिहासिक सत्यास न जुळणाऱ्या अशा आहेत. त्यांची येथें चर्चा कर- ण्याचें प्रयोजन नाहीं. पण त्या गोष्टी रामदासांचें महत्त्व वाढविण्याकरितां