पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. ९३ च्या हकीकतीशीं जुळतें. यावरून ती हकीकत त्या बखरींतून उतरून घेतली असावी असे वाटतें. पुढें सजनगडीं राहण्यास येण्याबद्दल शिवाजीनें रामदासांस विनंति केली, व त्यावेळी रामदासांनीं शिवाजीस नीतीचा उपदेश केला यासंबंधाचें पाल्हाळानें वर्णन केले आहे. आणखीही दोन. ठिकाण रामदासांचे उल्लेख आले आहेत. चिटणिसांच्या बखरींत मात्र रामदासाबद्दल बराच मजकूर आहे. शिवाजी व रामदास यांचा गुरु-शिष्यपणाचा संबंध होता व शिवाजीमहाराज रामदासांस केव्हां केव्हां सल्ला मसलत विचारीत असत असे म्हटले आहे. पण याचा उलगडा सहज होतो. मल्हार रामराव चिटणीस मराठीशाहीचे प्रसिद्ध बखरकार हे रामदासस्वामींची बखर करणारे हनुमानस्वामी यांचे समकालीन होते इतकेंच नव्हे तर हनुमानस्वामींनी चिटणिसांची मदत रामदासांची बखर लिहितांना घेतली होती असे हनुमानस्वामींच्या बखरींच्या उपलब्ध प्रतींची हकीकत देतांना सत्कार्योत्तेजक सभेच्या मासिकांत कबूल केले आहे. या वरून इतकें होतें कीं, रामदासांची शिष्यपरंपरागत हकीकत आतां समा. जांत बरीच प्रचलित झाली होती. तरी पण मराठीतील ऐतिहासिक बखरकाराला शोभेल अशा त-हेची चिकित्सक बुद्धि थोड्या तरी प्रमाणांत चिटणीस यांनी दाखविलेली आहे. कारण रामदासांच्या बखरींत अस- लेल्या सर्वच दंतकथांना चिटणीसांनीं शिवाजीच्या बखरींत जागा दिली नाहीं. शिवाजीनें राज्यस्थापनेला प्रारंभ १६४० मध्ये केला व त्याच्या मनांत राजकीय महत्वाकांक्षेच्या काना दहाबारा वर्षीपासून येऊ लागल्या. होत्या असे सांगितले आहे. पुढें रामदासांची कुळकथा सांगून शिवाजीची व रामदासांची भेट व रामदासांनीं शिवाजीला केलेल्या अनुग्रहाचें वर्णन हनुमानस्वामींच्या बखरी इतक्या पाल्हाळानें नसले तरी त्यांतल्या प्रमाणे केले आहे. नंतर शिवाजीनें दिल्लीस जाण्यापूर्वी रामदासांचें दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला होता असे सांगितले आहे. शिवाजीनें आपल्याला राज्याभिषेक करवून घेण्याचा निश्चय केल्यानंतर