पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. ९५ बनावट केलेल्या आहेत व शिवाजीच्या चरित्रांतील गोष्टी समाजांत प्रच लित झाल्यानंतर त्यांना जुळतील अशा तऱ्हेनें त्या बनविलेल्या आहेत हे मागें दिलेल्या रामदासांनीं भवानी देवीस शिवाजीच्या अंगांत येण्यास सांगितल्याबद्दलच्या आख्यायिकेच्या खालील विवेचनावरून दिसून येईल. शिवाजीवर भवानी देवीची कृपादृष्टि होती व बिकट प्रसंगी ती शिवा- जीच्या अंगांत येऊन त्याला सल्लामसलत देत असे व शिवाजी तदनुरूप वर्तन करीत असे ही गोष्ट शिवाजीच्या आयुष्यांतील एक अलौकिक गोष्ट होती. तिचें वर्णन शिवाजीच्या सर्व बखरकारांनी सारख्याच तऱ्हेनें केलेले आहे. ही शिवाजी बद्दलची गोष्टः शिवाजीच्या काळापासून समाजांत प्रचलित असावी. शिवाजीचा व रामदासस्वामींचा गुरुशिष्यसंबंध होता व त्या संबंधाप्रमाणें शिवाजी रामदासांस सर्व बाबतीत सल्लामसलत विचारी व त्यांची आज्ञा पाळी अशा प्रकारची दंतकथा रामदासांच्या पंथांत प्रचलित झाली किंवा प्रचलित केली गेली; तेव्हां शिवाजीच्या आयुष्यांतील भवानीच्या आख्या- यिकेशीं तिचा विरोध येऊं लागला. बरें जनमनांत मुरलेली भवानीच्या बद्दलची आख्यायिका बदलणे शक्य नव्हते. तेव्हां या जुन्या आख्यायि केला बाध न येई अशा तऱ्हेनेंच रामदासांना महत्त्व देणारी आख्यायिका रचण्यांत आली असे म्हणणें प्राप्त आहे. कारण अशी कल्पना करा की शिवाजीच्या आयुष्यांत अशी आख्यायिका नव्हती व शिवाजीची निस्सीम शिष्यभक्ति व रामदासांचें महत्त्व दाखविण्याकरितांच ही आख्या- यिका रचावयाची असती तर ती खालीलप्रमाणें रचणें स्वाभाविक व कल्पकतेला अनुरूप होतें. शिवाजीचा निश्चय कीं, स्वामींची आज्ञा झाल्याखेरीज कोणतेंहि काम सर्वथैव कर्तव्य नाहीं. गलीम लढाई करून आला असें तर संकट प्राप्त झालें. शिवाजी तर कारभान्याचें ऐकेना; तेव्हां रामदास एकदम प्रगट होऊन शिवाजीस म्हणाले, " तूं हा राज्यकारभार करतोस, यांत कोणें- समय कसा प्रसंग येईल याचा नेम नाहीं. आम्हीं तर तुम्हांपाशीं सतत नसणार व तुमचा नेम तर असा आहे; तो चालणार नाहीं. या करितां जसा प्रसंग येईल तशी मसलत करून काम करीत असावें.” यावर शिवाजी