Jump to content

पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९२ सज्जनगड व समर्थ रामदास. असें वर्णन आहे. आतां याचें प्रत्यंतर शिवाजीच्या बखरींत कितपत आहे असे पाहूं लागलें म्हणजे या हकीकतीच्या सत्यतेबद्दल संशय उत्पन्न होऊं लागतो. शिवाजीच्या पूर्व काळी लिहिलेल्या तीन चार बखरी आहेत. पहिली सभासदाची, दुसरी चित्रगुप्ताची तिसरी शिर्वादग्विजय नांवाची बखर व चवथी चिटणिसाची; या कालानुक्रमानें एकामागून एक झालेल्या आहेत व आश्चर्याची गोष्ट अशी कीं, सभासदाच्या बखरींत-जी बखर शिवाजीच्या मरणानंतर १४च वर्षांनी लिहिलेली आहे-रामदासांचा नुसता नामनिर्देशही नाही! मग त्यांच्या भेटीच्या किंवा गुरुशिष्यपणाच्या गोष्टींचा उल्लेख नाहीं हें सांगावयास नको. यानंतर लिहिलेली बखर म्हणजे चित्रगुप्त - विरचित बखर. या बखरींत रामदासांचें नांव दोनदांच आले आहे. पहिला उल्लेख खालील वाक्यांत आहे. " या कलियुग श्री ईश्वराच्या विभूति श्री रामदासस्वामी व महाराज औरंगझेब पादशाहास ज्ञानवंत जाणविलें." येथें शिवाजी व रामदासांच्या निकट संबंधाचा उल्लेख मुळींच नाहीं. दुसरा उल्लेख खालील वाक्यांत आहे. " जैशी श्री रामदासस्वामींनी महाराज सिंहासनाधीश्वर जहालिया नंतर कृपा करून राज्यनीति स्वतः मजसाठी शास्त्रसंमतें कृता त्रेता द्वापारीं जे जे धर्मपरायण पुण्यश्लोक सोमसूर्यवंशींचे राजे वर्तत आले त्याप्रमाणें राज्याधिकार या कलियुग करणे." येथें रामदासांनी शिवाजीस राज्याभिषेकानंतर राजनीति सांगितली असें म्हटले आहे. यापेक्षां चित्रगुप्ताच्या बखरींत रामदासांच्या व शिवा- जीच्या संबंधाबद्दलचा उल्लेख नाहीं. शिवादेग्विजय या बखरींत पहिला उल्लेख खालील वाक्यांत आहे. 'ब्रह्म विद्या आध्यात्मज्ञान प्रौढपणीं श्रीमत् सजनगड निवासी श्री- रामदासस्वामी यांजपासोन (शिवाजीमहाराज ) अधीत झाले. " पुढें या बखरीत शिवाजीच्या व रामदासांच्या प्रथम भेटीची व अनु- ग्रहाची सविस्तर हकीगत दिली आहे. ती बहुतेक शब्दशः हनुमानस्वामीं-