पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. ९१ याप्रमाणे रामदासांच्या चरित्रांतील परंपरागत आलेली हकीकत आहे. रामदासांचें वय निधनसमयीं व्याहात्तर वर्षांचे होतें. त्यांच्या आयुष्याचे छत्तीस छत्तीस वर्षांचे समसमान असे दोन भाग पडतात. त्यांची पहिली छत्तीस वर्षे बालपण, विद्याभ्यास, तपश्चर्या व तीर्थाटन यांत गेलीं असें दिसतें. या सर्व काळीं ते बहुतेक महाराष्ट्राच्या बाहेरच होते म्हटलें तरी चालेल. भागास प्रारंभ झाला. नंतर त्यांनी कृष्णाकांठीं दोनचार वर्षे घालवून आपला रामदासपिंथ काढण्याचा विचार करून तदनुरूप १६४८ मध्यें चाफळास रामाचें देवा- लय बांधून उत्साहास सुरवात केली. येथून त्यांच्या आयुष्यांतील दुसऱ्या ह्रीं बत्तीसतेहतीस वर्षे त्यांनी आपल्या पंथाचा प्रसार करण्यांत, त्या पंथाची शिष्यशाखा वाढविण्यांत, हरिकथाकीर्तनांत, व सर्वजनांना उपदेश करण्यांत घालविलीं असे दिसतें. रामदासांच्या बद्दल त्यांच्या शिष्यसमुदायांत विलक्षण आदरबुद्धि वंसत होती व त्यांच्या या उद्योगामुळे व आयुष्यांतील इतर अलौकिक गोष्टींमुळे त्यांना लोक अवतार मानूं लागले होते असे दिसतें. रामदासांची शिष्यशाखा फार मोठी होती; त्यांनी जागोजाग आपल्या पंथाचे मठ स्थापन केले होते; तसेंच राम व मारुती यांची पुष्कळ देवळें बांधलीं होतीं; या गोष्टी सत्कार्योत्तेजक सभेच्या उद्योगानें व त्यांनी छापलेल्या कागदपत्रांनी शाबीत झाल्या आहेत येवढें खरें. पण त्यायोगें रामदासांच्या चरित्रांतील हकी- कतीवर व शिवाजी-रामदास यांच्या संबंधावर फारसा प्रकाश पडला आहे असें मात्र वाटत नाहीं. शिवाजीचा व रामदासांचा संबंध केव्हां आला व तो कशा प्रकारचा होता या वादग्रस्त प्रश्नाचा विचार या पुस्तकाच्या शेवटच्या कलमांत स्वतंत्रपणे करावयाचा आहे. तेव्हां तूर्त रामदासांच्या चरित्रांतील परंपरया आलेली हकीकत ऐतिहासिक पुराव्याशी कितपत जुळते व या परंपरागत हकीकतींत धडधडीत खोट्या व बनावट गोष्टी कोणत्या आहेत त्या आतां पाहूं. हनुमानस्वामींच्या बखरींत शिवाजीचा व रामदासांचा अत्यंत निकट संबंध होता व शिवाजी वारंवार रामदासांची सल्लामसलत विचारीत असे.