पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. वयाचा याबद्दल स्वामींनीं आज्ञा करावी ह्मणून शिष्यांनी वारंवार विनंति केली. तेव्हां एकदां स्वामींनी सांगितलें कीं, जांबेहून श्रेष्ठांचा ज्येष्ठ पुत्र रामचंद्रबाबा यांना आणवून त्यांचे आज्ञेनें सर्व कारभार चालवावा. खरोखरी रामदासांची हीच आज्ञा होती किंवा शिष्यापैकी योग्य शिष्यानें मठाधिपति व्हावें अशी होती हैं समजणें कठीण आहे. इतकें खरें कीं, रामदासांच्या पश्चात् रामचंद्रबाबा या संस्थानाकडे आले नाहीत व मठाची सर्व व्यवस्था कांहीं काळपर्यंत तरी शिष्यांकडे होती. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत रामचंद्रबाबांचे चिरंजीव गंगाधरबाबा यांना परळी व चाफळ येथील अधिकार देण्यांत आला व पुढें तो अधिकार गंगाधरवावांच्या वंशजाकडे कायमचा आला, हें खरें; परंतु ही व्यवस्था शिष्यमंडळींतील व्यवस्थेसंबंधाचा तंटा कायमचा नाहींसा करण्याकरितां शाहू महाराजांनीं रामदासांच्या शिष्यांच्याच मदतीनें घडवून आणलेली दिसते. शिवाजीमहाराजांच्या मरणानंतर संभाजी राजे राज्यावर बसले. त्यांनीं चालविलेली अनन्वित कृत्ये ऐकून व शिष्यमंडळीच्या आग्रहावरून स्वामींनी संभाजीमहाराजांस उपदेशपर एक पत्र लिहिलें व आपल्या शिष्याबरोबर तें त्यांजकडे पाठवून दिलें, हें पत्र या पुस्तकाच्या कलम दोन याचें शेवटीं समग्र दिले आहे. त्यावरून रामदासांची शिवाजीबद्दल केवढी आदबुद्धि होती हैं व्यक्त होतें. याच सुमारास परळीच्या देवालयाकारतां चंदावराहून चार मूर्ति आल्या होत्या. त्या रामदासांनी सिंहासनावर बसवून घेतल्याने त्यांना फार समा- धान झालें. पुढें रामदासांनीं या मूर्तीची व चाफळच्या श्रीची पूजाअर्चा करून संस्थान संभाळून उपासनामार्ग चालवावा अशी अक्कास व इतर शिष्यमंडळीस आज्ञा केली. यानंतरं रामदास फार दिवस राहिले नाहींत. त्यांचें देहावसान सन १६८१ माघ वद्य नवमी रोजी झालें. स्वामींच्या देहाचें यथाविधि दहन करून उत्तर कार्य उद्धव गोसावी यांनी केलें. व त्या जागीं स्वामींची समाधि बांधून त्यावर लहानसें देवालय बांधून त्यांत रघुपतीच्या मूर्ति स्थापून त्यांची पूजाअर्चा सुरू केली व संस्थानचा कार- भार आका व दिवाकर गोसावी पाहू लागले. 0