पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सज्जनगड व समर्थ रामदास.


युरोपमध्ये केव्हां तरी प्रचंड युद्ध माजणार असे भाकीत कित्येक वर्षे कर- यांत आलें होतें, व कित्येक प्रसंग अचानकपणे टळले म्हणून नाहीं तर हें युद्ध आधींच सुरू झालें असतें; पण सराजोव्ह येथील खुनानंतर युद्धाचा प्रसंग टळला नाहीं. सारांश, ज्या गोष्टी वरकरणी आकस्मिक भासतात त्या खोल पाहिलें असतां आकस्मिक नसतात; त्या सकारण घडून येतात. असो.
 माझ्या सज्जनगडच्या सफरीच्या बाबतींत माझीच गोष्ट ध्याना; बाकी जगद्वव्यापी चळवळीच्या दाखल्यानंतर एका यःकश्चित् व्यक्तीच्या वर्तना- कडे वळणें म्हणजे कोणासहि हास्यास्पदच वाटेल; पण हालचाली लहान असोत किंवा मोठ्या असोत, कार्यकारणाचे धागे सर्वत्र सारखेच अस- तात, हें तरी त्या वरून दिसून येईल. मला माझ्या सातारच्या मित्राकडून आपण रचलेल्या व आपणच एका नाटक मंडळीकडून बसविलेल्या सामा- जिक नाटकाच्या प्रयोगाचें आमंत्रण येतें काय व मी पुण्याहून साताऱ्यास कॉलेज चालू असतां व सुटी नसतां ७० मैलांचा पायगाडीचा प्रवास करण्याचा बेत करतों काय ? हें प्रथमदर्शनी किती आकस्मिक वाटतें ? पण खरोखरी पहातां तें आकस्मिक नाहीं. या माझ्या बेताची कारण- परंपरा माझ्या पूर्ववर्तनांत व पूर्वप्रवृत्तीत आहे. मला आधीं पाय- गाडीची हौस फार; रोज पंधरापंधरा मैल चालण्याची संवय; शिवाय मी पायगाडीच्या किती तरी चक्करा मारलेल्या; मी जुन्नरसारख्या लांबलांब ठिकाणच्या पायगाडीचा प्रवास यशस्वी रीतीनें केलेला; तेव्हांपासून लांबचा प्रवास मुळींच न केलेला; बरेच दिवसांत पायगाडीवर पायहि न ठेवलेला; अशा स्थितीत माझ्या मित्राचें पत्र आलें व मला पायगाडीनें जाण्याची हुक्की आली, यांत आश्चर्य काय ? पण अशा आयत्या वेळीं केलेल्या बेतांत सामील कोण होतो ? माझे नेहेमींचे पायगाडीच्या चक्कराचे सोबती यहि आयत्या वेळीं पाय गाळले. पण मी बेत केला तो केलाच. इतका लांबचा प्रवास एकट्यानें करणें अगदीच त्रासदायक व कंटाळवाणें म्हणून 'प्राप्ते षोडशवर्षे तु पुत्रे मित्रवत् आचरेत् ' या न्यायानें मी आपल्या मुलाला बरोबर घेण्याचं ठरविलें व तीन वाजतां कॉलेजचें काम आटोपून