पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सज्जनगड व समर्थ रामदास.

 तो पार नाहींसा झाला. कारण, १८७०/७१ मध्यें ज्या राष्ट्रांत अलेक्झं- डर व सीझर यांसारख्या पूर्वकालीन जगज्जेत्यांच्या व जगद्वीरांच्या तोडीचा नव्हे थोडासा वरचढ असा - जगजेता व जगद्वीर उदयास आला, त्या फ्रान्स राष्ट्राचा सपशेल पराभव करून जर्मनीनें त्या राष्ट्राकडून अपूर्व खंडणी घेतली. या पराभवानें फ्रान्सला मरणप्राय दुःख झालें. व फ्रान्सचे आलसेस व लोरेन हे प्रांत आपल्या ताब्यांत घेऊन जर्मनीनें फ्रान्सच्या हृदयांत या पराभवाचें कायमचें शल्य करून ठेविलें. जर्मनीमध्येहि जास्त महत्त्वाकांक्षा उत्पन्न झाली व म्हणून विजयानें फुगून न जातां त्यानें आपली औद्योगिक शिक्षणविषयक व शास्त्रीय प्रगति करून घेण्याचा निश्चय केला व आपले लष्करी सामर्थ्य वाढविण्याकरितां सक्तीचें लष्करी शिक्षण सुरू केलें, जर्मनीनें तसें केल्याबरोबर फ्रान्सला आत्मसंरक्षणा- करितां तोच मार्ग स्वीकारावा लागला व युरोपमध्ये इंग्लंड खेरीज करून सर्वत्र सक्तीच्या लष्करी शिक्षणाचा क्रम सुरू झाला. जर्मनीला इंग्लंडच्या जगडव्याल साम्राज्याचा व विशेषतः जगह्यापी व्यापाराचा हेवा वाटुं लागला व शास्त्रीय शोधांनी जरी जर्मनीनं व्यापारांत सावकाशपणे व न कळत बरेच वर्चस्व मिळविलें होतें, तरी हें वर्चस्व कायम रहाण्यास व वाढण्यास आरमाराची जरूरी आहे, असें पाहून जर्मनीनें आरमार बांध- ण्यास सुरवात केली. ही सुरवात झाल्याबरोबर इंग्लंडाच्या नेहमींच्या धोरणाप्रमाणें त्यानेंहि आपले आरमार वाढविण्यास सुरवात केली. यामुळे फ्रान्सलाहि तेंच करणं प्राप्त झालें. तसंच, जर्मनीनें आपले सामर्थ्य वाढ- विण्याकरितां व आपल्या बाजूचा पक्ष युरोपांत करण्याकरितां राष्ट्राचे संघ- वनविण्याचा क्रम सुरू करून इटली व आस्ट्रिया हीं दोन राष्ट्र या संघांत सामील करून घेतली. फ्रान्सनें रशियाशी संगनमत केलें. आतां युरोपांतील मोठ्या राष्ट्रांपैकीं रहातां राहिलें इंग्लंड, व त्यालाहि आपण एकटेच एकीकडे पडलों असें वाटलें; फ्रान्सशीं पिढ्यानुपिढ्यांची चढा- ओढ असतां व रशियाश तर कित्येक वर्षांची तेढ असतांना हळू हळू त्याने या राष्ट्रांशी मिळतें घेऊन त्यांशीं सख्य संपादन केलें, याप्रमाणें युरोपांत राष्ट्रांचे दोन परस्परविरुद्ध असे डाव तयार झाले. अशा स्थितींत