पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ सज्जनगड व समर्थ रामदास. कोणीकडे शेवटास जावें । कोणी काय पहावें । असंभाव्य तें नेमावें । काय म्हणोनि ॥ स्थूळ नव्हे सूक्ष्म नव्हे । कांहीं एकासारिखें नव्हे । ज्ञान दृष्टीविण नव्हे । समाधान | पिंड ब्रह्मांड निरास । मन तें ब्रह्म निराभास । येथून तेथवरी आकाश । भकाश रूपें ॥ ब्रह्मव्यापक हें तो खरें । दृश्य आहे तो उत्तरें । व्याप्येवीण कोण्या प्रकारें । व्यापक म्हणावें ॥ ब्रह्मीं शब्दचि लागेना । कल्पना कल्पूं शकेना । कल्पनातीत निरंजना | विवेकें ओळखावें ॥ शुद्ध सार तें श्रवण । शुद्ध प्रत्ययाचें मनन । विज्ञानी पावतां उन्मन । सहजचि होतें || झालें समाधानाचें फळ । संसार झाला सफळ । निर्गुण ब्रह्म तें निश्चळ । अंतरीं विंबलें ॥ हिशेव झाला मायेचा | झाला निवाडा तत्वांचा | साध्य होतां साधनांचा । ठाव नाहीं ॥ स्वप्नीं जें जें देखिलें । तें तें जागृतीस उडालें । सहजचि अनिर्वाच्य झालें । बोलतां नये ॥ ऐसें हें विवेकें जाणावें । प्रत्ययें खुणेसी बाणावें । जन्ममृत्यूच्या नांवें । शून्य कर ॥ भक्तांचेनि साभिमानें । कृपा केली दाशरथीनें । समर्थकृपेचीं वचनें । तो हा दासबोध ॥ वीस दशक दासबोध । श्रवणद्वारें घेतां शोध | मननकर्त्यास विशद | परमार्थ हो तो ॥ वीस दशक दोनशें समास । साधकें पहावे सावकाश । विवरतां विशेषाविशेष । कळों लागे ॥ ग्रंथाचें करावें स्तवन । स्तवनाचें काय प्रयोजन । तेथें प्रत्ययास कारण | प्रत्यया पहावा ॥