पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. देह तव पांचा भूतांचा । कर्ता आत्मा तेथींचा । आणि कवित्व प्रकार मनुष्याचा | कशावरूनी ॥ सकळ करणें जगदीशाचें । आणि कवित्वचि काय मनुष्याचें । ऐशा अप्रमाण बोलण्याचें | काय घ्यावें ॥ सकळ देहांचा झाडा झाला | तत्वसमुदाय उडाला । तेथें कोण्या पदार्थाला । आपलें म्हणावें ॥ ऐशीं ह्रीं विवेकाची कामें । उगेंचि भ्रमों नये भ्रमें । जगदीश्वरें अनुक्रमें । सकळ केलें ।। ७३ ८ दासबोधरूपी कावतार्णवाच्या पार पडलों. मधून पोहत पोहत जात असतांना जेवढीं संग्राह्य रत्नें होतीं आली तेवढी वाचकांस सादर केलीं. आतां एकंदर दासबोधांतील विषयाचें व उपदेशाचें पर्यालोचन करूं. उपक्रमोपसंहारावरून एखाद्या ग्रंथाचा आशय व इत्यर्थ काढण्याची रीत आहे. दासबोधाचा उपक्रम पूर्णपणें आध्यात्मिक आहे हें पहिल्या दशकाच्या पहिल्या समासावरून स्पष्टच आहे. आतां सातव्या दशकाच्या शेवटचा उपसंहार ब्या किंवा विसाव्या दशकाच्या शेवटचा समास घ्या, दोन्ही उपसंहारांवरून दासबोधाचा आध्यात्मिक आशय उघड दिसून येतो. त्याचप्रमाणे ग्रंथाच्या एकंदर विवेचनाकडे व आध्यात्मिक व व्यावहारिक उपदेशाच्या जास्त कमी प्रमाणाकडे पाहिलें तरी दासबोधाचा आशय आध्यात्मिक आहे असेंच म्हटले पाहिजे. आध्यात्मिक विषय दासबोधांत वारंवार आलेले आहेत; त्याच त्याच विषयाची किती तरी वेळां पुनरुक्ति झालेली आहे; एक विषय निरनिराळ्या उपमांनीं निरनिराळ्या शब्दांनीं व निरनिराळ्या प्रकाराने वाचकांच्या मनांत ठसविण्याचा प्रयत्न केला आहे. यावरून