Jump to content

पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. परि तो आहे एक देशी । दृष्टांत न घडे वस्तूसी । कांहीं एक चमत्कारासी । देऊन पाहिला ॥ नाना तीथें नाना देशीं । कष्टत जावें पहावयासी । तैसें नलगे परब्रह्मासी । बैसले ठायीं ॥ प्राणी बैसोनीच राहतां । अथवा बहुत पळोन जातां । परब्रह्म तें तत्वतां : समागमें || पक्षी अंतराळी गेला । भोवतें आकाशचि तयाला ।. तैसें ब्रह्म प्राणियाला । व्यापून असे ॥ ब्रह्म पोकळ घनदाट । ब्रह्म शेवटाचा शेवट । ज्यासी त्यासी ब्रह्म नीट | सर्व काळ ॥ दृश्या सबाह्य अंतरीं । ब्रह्म दाटलें ब्रह्मांडोदरीं । अरे त्या निर्मळाची सरी । कोणास द्यावी ॥ वेकुंठ कैलास सत्यलोकीं । इन्द्रलोकीं चौदालोकीं । पन्नगादि पाताळलोकीं । तेथेंही आहे ॥ काशीपासून रामेश्वर । अवघें दाटलें अपार । पाहों जातां पारावार । त्यासी नाहीं ॥ परब्रह्म तें एकलें । एकदांचि सकळासि व्यापिलें । सकळांस स्पर्शोन राहिलें । सकळां ठायीं ॥ परब्रह्म पाऊसें भिजेना । अथवा चिखलानें भरना । पुरामध्यें परी वाहेना । पुरा समागमें ॥ एक सरें सन्मुख विन्मुख । वामसव्य दोहींकडे एक । अधरूर्ध्व प्राणी सकळिक । व्यापून आहे ॥ आकाशाचा डोहो भरला । कदापि नाहीं उचंबळला । असंभाव्य पसरला । जिकडे तिकडे ॥ एक जिनसी गगन उदास । जेथें नाहीं दृश्यभास | भासेंवीण निराभास | परब्रह्म जाणावें ॥ संत साधु महानुभावां । देवदानवां मानवां । परब्रह्म सकळांस विसावा | विश्रांतिठाव ॥