पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. सांगितले आहे व पुढे मागील समासांत ज्याप्रमाणें मनुष्य देहाचे विशेष गुण सांगितले आहेत त्याप्रमाणे येथे आत्म्याचे गुण सांगितले आहेत. सातव्या समासांत आत्म्याच्या गुणाचें निरूपणच पुढे चालवून समा- साचे शेवटीं पुन्हां अनुमानापेक्षां प्रत्ययज्ञान विशेष आहे व म्हणूनच प्रत्ययज्ञानाला जाणते पुरुष अधिक चाहतात असे म्हटले आहे. ७० आठव्या समासांत प्रपंचाला झाडाची उपमा देऊन त्या रूपकानें सर्व प्रपंचाचें मानवी देहाचें व सृष्टीरचनेचें वर्णन करून हा सर्व प्रपंच म्हणजे आत्म्याचे भेद आहेत असे सांगून अशा आत्म्याचें भेदरूप वर्णन करणें ही एक उपासना आहे असे प्रतिपादन केले आहे.. नवव्या समासाच्या प्रारंभ मूर्तीपूजेच्या प्राकृत जनाच्या प्रवृत्तीचा उल्लेख करून खरा देव पूजन विसर्जन करण्यासारखा नाहीं खरा देव विवेकानेंच ओळखला पाहिजे व असा देव म्हणजे निर्गुण निर्विकारी सर्वव्यापी निष्कलंक असें परब्रह्मच आहे व म्हणून परब्रह्मच मनीं दृढ धरावें असा उपदेश केला आहे. दहाव्या समासांत परब्रह्माच्या स्वरूप वर्णनापासून प्रारंभ करून हैं परब्रह्म मनांत विंबलें म्हणजे जन्माचें व संसाराचें सार्थक झाले असे ह्मणून ग्रंथाची समाप्ति केली आहे. हा सर्व समासच येथें देणें इष्ट आहे.. धरूं जातां धरतां नये । टाकूं जातां टाकितां नये । जेथें तेथें आहेच आहे । परब्रह्म तें ।। जिकडे तिकडे जेथें तेथें । विन्मुख होतां सन्मुख तें । सन्मुखपण चुकेना तें । कांहीं केल्या ॥ बैसलें माणूस उठोन गेलें । तेथें आकाशचि राहिलें । आकाश चहूंकडे पाहिलें । तरी सन्मुखाचे आहे ॥ जिकडे प्राणी पळोन जातें । तिकडे आकाशची भोवतें । बळें आकाशाबाहेरी तें । कैचें जावें ॥ जिकडे तिकडे प्राणी आहे । तिकडे तें सन्मुखाचे आहे । समस्तांचे मस्तकीं राहे । मध्यान्हींचा मार्तंड जैसा ।