पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. प्रपंच अथवा परमार्थ । प्रचीतीवीण अवघे व्यर्थ । प्रत्ययज्ञानी तो समर्थ । सकळांमध्यें || चवथ्या समासांत प्रत्यय ज्ञानाचेंच निरूपण पुढे चालविले आहे. सकळ जनास प्रार्थना । उगेंच उदास करवना । निरूपण आणावें मना | प्रत्ययाचें ॥ प्रत्यय राहिला एकीकडे । आपण धांवतो भलतीकडे । तरी मग संसाराचे निवाडे । कैसे होती ॥ उगीच पाहतां सृष्टी । गलवला दिसतो दृष्टी । परी राजसत्तेची गोष्टी | वेगळीच || पृथ्वीमध्यें जितुकों शरीरें । तितुकीं भगवंताचीं घरें । जाना सुखें येणें द्वारें । प्राप्त होती ।। त्याचा महिमा कळेल कोणाला । मातेवांचून कृपाळू झाला । प्रत्यक्ष जगदीश जगाला । रक्षीतसे ॥ Ste

वनावरी वनचरांची सत्ता । जलावरी चलचरांची सत्ता । भूमंडळीं भूपाळाची सत्ता । येणेंचि न्यायें ॥ सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें । परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥ पांचव्या समासांत निर्गुण परब्रह्म हा एक जिन्नस त्रिगुण व माया यांची करणी हा दुसरा जिन्नस पंचमहाभूतें हा तिसरा जिन्नस व सजीव प्राणी हा चवथा जिन्नस अशी चार जिनसी पायऱ्यांनीं सृष्टीची उभारणी झाली आहे असे सांगितले आहे; व नंतर नरदेहाची दुर्लभता व ला देहाला होणारें विशेष ज्ञान याचें गौरव करून या देहाचें सार्थक आळस टाकून विवेकानें वागण्यांत आहे, असे प्रतिपादन केले आहे. सहाव्या समासांत चार लक्ष माणसें तीस लक्ष पशू व अकरा लक्ष काम दहा लक्ष पक्षी नऊ लक्ष जलचर प्राणी आणि वीस लक्ष स्थावर मिळून चवऱ्यायशी लक्ष जीवयोनी शास्त्रकारांनी मानल्या आहेत असे