पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. तो प्रत्येकाच्या अन्तर्यामीं आहे असे म्हणून अशा प्रकारचें ज्ञान सत्संगानें लाभतें व मग तें अनुभवासही येतें व त्या योगें सद्गति मिळते असें सांगितले आहे. पांच ते दहा या सर्व समासांत अर्धवट व्यावहारिक व अर्धवट पार- मार्थिक उपदेश आहे. हा उपदेश रामदासीपंथाच्या लोकांना किंवा राम- दासांकडे वारंवार येणाऱ्या संसारी व प्रापंचिक माणसांना केलेला दिसतो; कथाकीर्तन करावें; ज्ञानी आणि विवेकी व्हावें; कथाकीर्तन विषयाचें ज्ञान चांगले मिळवावें; लोकांना राजी राखावें; जशास तसें वागावें वगैरे राज- कारणी व व्यावहारिक भासणारे नियम दिले आहेत. या पांचही समासां- तील कांहीं उतारे देऊन हा दशक संपवूं. आपण तुरुक गुरु केला । शिष्यांचा भार मेळविला ! नीच यातीनें नासला । समुदाय ॥ ब्राह्मण मंडळ्या मेळवाव्या | भक्त मंडळ्या मानाव्या | संतमंडळ्या शोधाव्या । भूमंडळीं ॥ उत्कृष्ट भव्य तेंचि घ्यावें । मळमळीत अवघेंचि टाकावें । निस्पृहपणें विख्यात व्हावें । भूमंडळीं ॥ अक्षर वरें वाचणें । अर्थातर सांगणें वरें । गाणें नाचणें अवघेंचि बरें । पाठांतर ॥ दीक्षा बरी मैत्री बरी । तीक्ष्ण बुद्धि राजकारणीं वरी । आपणास राखे नाना परी । अलिप्तपणें ॥ अखंड हरिकथेचा छंद । सकळांस लागे नामवेध । प्रगट जयाचा प्रबोध | सूर्य जैसा ॥ दुर्जनासी राखों जाणे । सज्जनासी निववूं जाणे । सकळांचे मनींचें जाणे । ज्याचें त्यापरी ॥ संगतीचें मनुष्य पालटे । उत्तम गुण तत्काळ उठे । अखंड अभ्यासी लगटे | समुदाय || जो दुसऱ्यावरी विश्वासला । त्याचा कार्यभाग बुडाला I जो आपणचि कष्टत गेला । तोचि भला ||