Jump to content

पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. आळसें कार्य नासतें ! हें तो प्रत्ययास येतें । कष्टाकडे चुकविते । हीन जन ॥ आधीं कष्टाचें दुःख सोसिती । ते सुखाचें फळ भोगिती । आधीं आळसें सुखावती । त्यांसि पुढें दुःख । आठव्या समासांत निराकार ब्रह्म व सगुण ब्रह्म यांचा भेद सांगून लोक पाषाणाचे अनेक देव शोधतात व प्रतिमेस भजतात; पण त्यांना ' मूर्खास प्रतिमा देव' हे कळत नाहीं असें हाटले आहे. नवव्या व दहाव्या समासांत हरिकीर्तनाचे वेळीं लोक आळस व राग लोभ इत्यादि मनोवृत्तींच्या अंमलामुळे कसे वागतात याचें हास्यकारक वर्णन करून दशक संपविण्यांत आला आहे. ६५ एकुणीसाव्या दशकाची रचना चवदाव्या दशकासारखी आहे. चवदा- व्यांत दोन समास पारमार्थिक व वेदांतमतप्रतिपादी आहेत, इतकेही या दशकांत नाहींत. यांत व्यवहारपरिप्लुत असा उपदेश फार आहे; तसेंच रामदासीपंथाच्या लोकांना उपदेश केल्याप्रमाणें येथेंहि भास होतो. चव- दाव्या दशकाप्रमाणें हा दशकहि अर्वाचीन काळाच्या मनुष्याचेंसुद्धां मन वेधणारा आहे. चवदाव्याप्रमाणे या दशकांतहि राजकारणाचा दोनचारदां उल्लेख आला आहे व रामदासांनी राजकारणाचें ध्येय लोकांपुढें अनुकर णीय म्हणून ठेविलें आहे; तसेंच या दशकांत म्लेंच्छ अंमलाचा उल्लेख आला आहे व शेवर्टी सार्वत्रिक शिक्षणाचें ध्येय रामदासांनी उच्च स्वराने प्रतिपादन केले आहे. पहिल्या समासांत ब्राह्मणानें आपले अक्षर उत्तम घटवावें व चांगल्या गोथ्या लिहून त्यांची जतन करावी म्हणून सांगितले आहे. दुसऱ्या समा- सांत अक्षराप्रमाणें मनुष्यानें उत्तम ज्ञान मिळवावें व चातुर्य संपादन करावें असा उपदेश केला आहे. तिसऱ्या व चवथ्या समासांत अनुक्रमें करंट लक्षण व सदैव (दैववान्) लक्षण सांगितले आहे. यांमध्ये पूर्वी- च्या मूर्ख लक्षण व उत्तम लक्षण या समासांची बरीच झाक मारते. पाचव्या समासांत मनुष्यें हजारों प्रकारच्या देवाच्या प्रतिमा करून त्याचें भजन पूजन करतात असे सांगितले आहे. पण खरा देव एकच आहे क स...५