पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. सकळकर्ता तो ईश्वर । तेणें केला अंगिकार | तया पुरुषाचा विचार । विरळा जाणे ॥ न्याय नीति विवेक विचार | नाना प्रसंग प्रकार । परीक्षणें परांतर । देणें ईश्वराचें ॥ महायत्न सावधपणें । समयीं धारिष्ट धरणें । अद्भुतचि कार्य करणें । देणें ईश्वराचे ॥ यश कीर्ति प्रताप महिमा | उत्तम गुणांसि नाहीं सीमा | नाहीं दुसरी उपमा । देणें ईश्वराचें ॥ देव ब्राह्मण आचारविचार | कितीक जनास आधार । सदा घडे परोपकार । देणें ईश्वराचें ॥ इहलोक परलोक पाहाणें । अखंड सावधपणें राहणें । बहुतजनाचें साहाणें । देणें ईश्वराचें ॥ 'देवाचा कैपक्ष घेणें । ब्राह्मणाची चिंता वाहणें । बहु जनांस पाळणें । देणें ईश्वराचें ॥ धर्मस्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार । झाले आहेत पुढे होणार । देणें ईश्वराचें ॥ उत्तम गुणाचा ग्राहक । तर्क तीक्ष्ण विवेक । धर्मस्थापना पुण्यश्लोक । देणें ईश्वराचें ॥ सकल गुणांमध्ये सार । तजविजा विवेक विचार । जेणें पाविजे पैलपार | अरत्रपरत्रींचा || सातव्या समासांत मनुष्याच्या लोभी, आळशी, करंट्या स्वभावाचें वर्णन असून श्रमावांचून कांहींही होणार नाही असे प्रतिपादन केले आहे. जनाचा लाळुची स्वभाव | आरंभींच म्हणती देव । म्हणजे मजला कांहीं देईल देव । ऐशी वासना ॥ कांहीं भक्ति केली नसतां । आणि इच्छिती प्रसन्नता । जैसे कांहींच सेवा न करितां । स्वामीस मागती ॥ कष्टेंविण फळ नाहीं । कष्टाविण राज्य नाहीं । केल्याविण होत नाहीं । साध्य जनीं !