पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
सज्जनगड
समर्थ रामदास.

  स्त्रियाच्या बोसनिया प्रांतांतील सराजोव्ह या गांवीं 'आस्त्रियाचा युवराज व युवराज्ञी यांचा खून होतो काय, व त्रिखंड पसरलेलें व अप्रत्यक्ष रीतीनें सर्व खंडांस भोवणारे विलक्षण युरोपीय युद्ध सुरू होतें काय ? वर वर पहाणान्यास या गोष्टी किती आकस्मिक वाटतात; पण युरोपच्या इतिहासाकडे थोड्या बारकाईनें पाहिलें म्हणजे युवराजाचा खून हैं या युद्धाचें निवळ निमित्त होते. खरी कारणें निराळींच होतीं असें कळून आल्याखेरीज रहात नाहीं, व ज्या गोष्टी घडून आल्या त्या ओक- स्मिक नाहींत, असें समजून येतें.
 हल्लींच्या युद्धाचें मूळ फार लांबवर पोंचलेलें आहे. त्याचा धागा १८७०।७१ मधल्या जर्मनीच्या फ्रान्सवरील अद्वितीय विजयापर्यंत पोचतो. या जयानें जर्मन जनतेला आत्मविश्वास व आत्मप्रत्यय पटला. असा विश्वास जर्मनीच्या धोरणी मुत्सद्यांमध्ये होताच; पण तो जनतेला पटला नव्हता; व तो जनतेला पटावा, जर्मनीचें सावकाश व नकळत वाढलेलें सामर्थ्य जगाच्या निदर्शनास यावें, या हेतूनेंच हें युद्ध सुरू करण्यांत आलें. या आत्मप्रत्ययानें जर्मनीचें ताबडतोब एकीकरण होऊन जर्मनीचें साम्राज्य बनलें. जर्मन लोक म्हणजे कल्पनासृष्टीत व तत्त्वज्ञानांत गढून जाणारे बिनलढवय्ये लोक असा जो युरोपांत वृथा समज पसरला होता,