पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. असतां हा सहावा समास सांगितला असे म्हणतात. हा समास सर्वच येथे उतरून घेणें बरें. भवानी देवी, राजकारण व धर्मस्थापना वगैरेंचा उल्लेख विशेष ध्यानांत ठेवण्यासारखा आहे यांत शंका नाहीं. नाना व नाना भूषणें । येणें शरीर शृंगारणें । विवेकें विचारें राजकारणें । अंतर शृंगारिजे || शरीर सुंदर सतेज । वस्त्रें भूषणें केलें सज्ज | अंतरीं नसतां चातुर्य बजि । कदापि शोभा न पाविजे ॥ तुंद हेंकाड कठोरवचनी । अखंड तोले साभिमानीं । न्याय नीति अंतःकरणीं । घेणार नाहीं ॥ तरी शीघ्रकोपी सदा । कदापि न धरी मर्यादा । राजकारणें संवादा । मिळोंच नेणें ॥ वेइमानी । कदापि सत्य नाहीं वचनीं ।। पापी अपस्मार जनीं । राक्षस जाणावे ॥ समयासारिखा समय येइना । नेम सहसा चालेना । नेम धरितां राजकारणा । अंतर पडे ॥ अति सर्वत्र वर्जावें । प्रसंग पाहोन चालावें । हटनिग्रहीं न पडावें । विवेकी पुरुषे ।। बहुतचि करितां हट । तेथें येऊन पडेल तट । कोणी ऐकाचा सेवट । झाला पाहिजे ॥ बरें ईश्वर आहे साभिमानी । विशेष तुळजा भवानी । परंतु विचार पाहोनी । कार्य करणें ।। अखंडचि सावधाना । बहुत काय करावी सूचना । परंतु कांहीं एक अनुमाना । आणिलें पाहिजे ॥ समर्थापाशीं बहुत जन । राहिला पाहिजे साभिमान । निश्चळ करूनियां मन । लोक असती ॥ म्लेंच्छ दुर्जन उदंड । बहुतां दिवसांचें माजलें बंड | याकारणें अखंड । सावधान असावें ॥