६२ सज्जनगड व समर्थ रामदास. गुंतागुंत पूर्वीच्या समासांत दिसून येत नाहीं. या दोन समासांत रामदा- सांनीं वेदांती पारिभाषिक शब्दांच्या व्याख्या दिल्या आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण या चार प्रकारच्या देहांच्या अवयवांचें वर्णन केले आहे. स्थूल देह पांच पांच स्वरूपाच्या पंचमहाभूतांनीं झाला आहे; अन्तः- करण, मन, बुद्धि, चित्त व अहंकार मिळून अन्तःकरणपंचक, पंचप्राण; पांच ज्ञानेंद्रियें; पांच कर्मेन्द्रिय व शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे पांच विषयपंचक, अशा पंचवीसां मिळून सूक्ष्म देह झाला आहे. कारणदेह अज्ञानानें झाला आहे; व महाकारणदेह ज्ञानानें झाला आहे; वया देहाच्या निरासानें जें विशेष ज्ञान होतें तेंच परब्रह्म होय, असें या दोन समासांत निरूपण केले आहे. दहाव्या समासांत रामदासांनी ज्ञान मिळ- विण्याकरितां सत्संगति धरावी व उत्तम गुण अंगीं आणावे असा उपदेश करून दशक संपविला आहे. अठरावे दशकाच्या पहिल्या समासांत निरनिराळ्या देवांच्या स्तुतीनें प्रारंभ करून शेवटी सर्व देवांचा देवेश्वर म्हणजे अंतरात्माच केवळ आहे व त्याच्याच निष्ठेनें मानत्र भवसागर तरून जातात असे सांगितलें आहे. दुसऱ्या समासांत उत्तम पुरुषलक्षणाप्रमाणे जाणत्या माणसाचें सवि- स्तर वर्णन केलें आहे, त्यांत व्यावहारिक उपदेशाचा भाग पुष्कळ आहे व शेवटीं स्वरा जाणता म्हणजे अन्तरात्माच होय असें सांगून त्याची भक्ति करण्याचा उपदेश केला आहे. तिसऱ्या व चवथ्या समासाचा विषय एकच आहे. त्यांत मनुष्य देहाची महति वर्णन केली आहे. मनुष्यदेह दुर्लभ आहे; त्या देहाकरितांच सर्व- व्याप मनुष्यांना करावा लागतो; देहामुळेच मनुष्याच्या हातून कांहीं तरी कर्तबगारी होते; म्हणून मनुष्यानें सर्व प्रकारचे उत्तम गुण या देहांत असतांना मिळवावे तरच देहाचें सार्थक केल्यासारखे होईल असें प्रति- पादन केलें आहे. पाचव्या समासांत सार आणि असार यांतला भेद ओळखून तदनुरूप वर्तन करावें म्हणजे मनुष्याला समाधान प्राप्त होतें, असें सांगितलें आहे. अफजूलखानाचा वध करून महाराज श्रीसमर्थांच्या दर्शनास आले
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/६७
Appearance