पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. केले आहे. चवथ्या समासांत ज्ञाता व तें ज्ञान दुसऱ्यास सांगणारा यांचें गौरव केले आहे. 6 मूळ एका स्वरापासून 'सारिगमपघनिधसा' हें स्वरसप्तक बनले व स्वरामध्यें तार, मंद्र, घोर वगैरे भेद झाले, त्याचप्रमाणें परब्रह्माची गोष्ट आहे; मनुष्य एकांतांत असला व एकाग्र चित्त करून बसला म्हणजे त्याला सोहं सोहं ' चा भास आपोआप होतो; याप्रमाणे साहजिक क्रियांनीं सुद्धां परमात्मप्राप्ति होते; मात्र त्याला ज्ञान पाहिजे; नाहीं तर घरांत पुरलेलें धन असून त्या गोष्टीच्या अज्ञानामुळें मनुष्य दारिद्य भोगतो, त्याप्रमाणें आत्मा आपल्याजवळच असतांना मनुष्य दुःख क्लेश भोगतो; • इत्यादि निरूपण पांचव्या समासांत केले आहे. सहाव्या समासांत दासबोधाच्या दुसऱ्या अर्ध्यात क्वचित् दृग्गोचर होणाऱ्या मानवी आयुष्याच्या दुःखमय स्थितीचें वर्णन आहे; जन्मापासून भरणापर्यंत कशा नाना यातना व नाना संकटें मनुष्यास भोगावी लागतात याचें भडक रंगांत चित्र काढले आहे. सातव्या समासांत पुनः व्यावहारिक उपदेशाच्या पालुपदावर रामदास आले आहेत व या समासाचा प्रारंभ एका सुंदर उपमेनें केला आहे. ज्या प्रमाणे पाणी निवळ असतें व तें नाना वल्लींमध्यें जाते व त्या वल्लीच्या स्वभावाप्रमाणें तीक्ष्ण, कडवट, गोड वगैरे रुचि त्याला येते त्याप्रमाणें आत्मा, देहसंगानें विकार पावतो. याकरितांच मनुष्यानें सत्संगति धरावी म्हणजे त्याला सद्गुण लाभतात. यावरून मनुष्याचें हितानहित त्याच्या कृतीवरच अवलंबून आहे; मनुष्य आपलाच शत्रु होईल किंवा आपला मित्र होईल म्हणून खालीलप्रमाणें मनुष्यानें वागले पाहिजे. वाळपण तारुण्य आपलें । वृद्धपणीं प्रचीतीस आलें । ऐसे जाणोन सार्थक केलें । पाहिजे कोणे एकें ।। देहें जैसे केले तैसें होतें । यत्न केल्या कार्य साधतें । तरी मग कष्टावें तें । काय निमित्त ॥ आठव्या व नवव्या समासांमध्ये फारच द्विरुक्ति झाली आहे. इतक्या एका पुढे एक असलेल्या समासांत इतकी द्विरक्ति व एकाच विषयाची "