Jump to content

पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. मनुष्यास मिळतात; पृथ्वीलाच बहुरत्ना वसुंधरा' असें अन्वर्थकपणें ह्यणतात; 'मी - माझें करणारे' सर्व अभिमानी पुरुष यांचा जन्मापासून मरणापर्यंत सर्व व्यवहार पृथ्वीवरच होतो; इतका पृथ्वीचा महिमा आहे हें रामदासांनी या समासांत दाखविले आहे. चवथ्या समासांत पाण्याची स्तुति केली आहे. पृथ्वीवर समुद्र, नद्या, सरोवरें, झरें, पाझर अशा नानारूपानें सर्वत्र पाणी आहे; सर्व द्रवरूप पदार्थात पाणीच आहे; मुक्ताफळाचें पाणी; रत्नाचें पाणी व शस्त्रांचें पाणी ( येथे पाणी शब्दांच्या संदिग्धपणाकडे दुर्लक्ष झाले आहे ) हें पाण्याचेंच रूप आहे वगैरे तऱ्हेचे पाण्याचे प्रकार वर्णिले आहेत. & पांचव्या समासांत अग्नीचें स्तवन केले आहे. जठराग्नि, वडवाग्नि वगैरे अग्नीचे प्रकार येथे सांगितले आहेत; व त्यांचें 'अंत्यजगृहींचा अग्नि आणिला । त्यास दोष नाहीं बोलिला' सकळ गृहीं पवित्र झाला । वैश्वानरू || अग्निहोत्र नाना याग । अग्निकरितां होतां सांग | अग्नि तृप्त होतां मग । प्रसन्न होय । या तऱ्हेनें वर्णन केले आहे. साहाव्या समासांत वायूची प्रार्थना केली आहे व त्यांत वायूचा पुत्र हनुमान ही कथा देऊन हनुमानाच्या पराक्रमाचें वर्णन केले आहे. सातव्या समासांत महाभूतांचें मूळ अन्तरात्मा होय असे सांगून तो अन्तरात्मा सर्वाचें ठायीं आहे व तो पुरुषप्रकृती या जोडीनें प्रकट होतो असे सांगितले आहे. आठ, नऊ व दहा हे समास पुनः नेहमींच्या वेदांती विचारांनीं भर- लेले असून पंचमहाभूतांची उत्पत्ती आत्म्यापासून कशी झाली; या जगांत निरनिराळे ऋतु, दिवसरात्र वगैरे व्यवस्था कशा अस्तित्वांत आल्या व या सर्व व्यवस्थेचें मूळ सर्वशक्तिमान्, सर्वज्ञ असा अन्तरात्मा कसा आहे याचें विवेचन करून हा सोळावा दशक संपविला आहे. सतरावा दशक पुनः वेदांतपर आहे. पहिल्या तीन समासांत परब्रह्म च त्याच्या मायेनें उत्पन्न झालेले भेद व भेदानें भरलेला संसार याचें वर्णन