Jump to content

पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. सातव्या समासांत संसाराला चंचल नदीची उपमा देऊन तिचें स्पष्टी- करण केलें आहे, व ज्ञानी लोकच ही नदी तरून जाऊं शकतात असे सांगितले आहे. आठव्या समासाचा प्रारंभ नवीन ग्रंथाच्या किंवा प्रकरणाच्या सुरुवाती सारखा आहे. आधी वंदू सकळकर्ता । समस्त देवांचा जो भर्ता । त्याचे भजनीं प्रवर्ता । कोणीतरी ॥ तेणेंविण कार्य न चले । पडिलें पूर्ण तेंहि न हाले । अवघें त्रैलोक्याचे चाले । जयाचेनि || ४७ दहाव्या समासांत पुन्हां व्यावहारिक उपदेश आहे. तो बहुतेक समास येथें अवतरणरूपानें घेणें बरें. मूर्ख एकदेशी होतो । चतुर सर्वत्र पाहतो । जैसा बहुधा होऊनि भोगितो | नाना सुखें ॥ तोचि अंतरात्मा महंत । तो कां होईल संकोचित । प्रशस्त जाणतां समस्त । विख्यात योगी ॥ कर्ता भोक्ता तत्वता | भूमंडळीं सर्व सत्ता । त्या वेगळा त्यास ज्ञाता । पाहेसा कवण || ऐसें महंतें असावें । सर्व सार शोधूनि घ्यावें । पाहों जातां न सांपडावें । एकाएकीं ।। कीर्तिरूपें उदंड ख्यात । जाणती लहान थोर समस्त । वेष पाहतां शाश्वत । एकहि नाहीं ॥ प्रगट कीर्ति ते ढळेना । बहुत जनांस कळेना । पाहों जातां आढळेना । काय कैसें ॥ वेषभूषण तें दूपण | कीर्तिभूषण तें भूपण । चालणेविण एक क्षण | जाऊंच नेदी ॥ त्यागी ओळखीचे जन । सर्वकाळ नित्य नूतन | लोक शोधून पाहती मन । परी इच्छा दिसेना ||