पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८ सज्जनगड व समर्थ रामदास. पुर्ते कोणाकडे पाहेना । पुर्ते कोणासी बोलेना । पुर्तें एके स्थळीं राहेना । उठोन जातो ॥ जातो स्थळ तें सांगेना । सांगितलें तरी तेथें जाईना । आपली स्थिति अनुमाना | येऊंच नेदी || लोकीं केलें तें चुकवी । लोकीं भाविलें तें उलथवी । लोकीं तर्किलें तें दावी | निष्फळ करूनी ॥ लोकांस पाह्याचा आदर । तेथें याचा अनादर । लोक सर्वकाळ तत्पर । तेथें याची अनिच्छा | एवं कल्पितां कळेना । तर्कितांहि तर्केना । कदापि भावितां भावेना | योगेश्वर || ऐसें अंतर सांपडेना । शरीर ठायीं पडेना । क्षण एक विसंवेना । कथाकीर्तन ॥ 1 लोक संकल्प विकल्प करिती । ते अवधेच निष्फळ होती ।. जनाची जना लाजवी वृत्ती । तेव्हां योगेश्वर ।। बहुत शोधून पाहिलें । बहुतांच्या मनास आलें । तरी मग जाणावें साधिलें । महत्कृत्य ॥ अखंड एकांत सेवावा । अभ्यासाच करीत जावा । काळ सार्थकाचे करावा । जनासहित ॥ उत्तम गुण तितुके घ्यावे । घेऊन जनास शिकवावे । उदंड समुदाय करावे । परी गुप्तरूपें ॥ अखंड कामाची लगवग । उपासनेस लावावें जग । लोक समजोन मग । आज्ञा इच्छिती ।। आधीं कष्ट मग सुफळ । कष्टुचि नाहीं तें निष्फळ । साक्षेपेंविण केवळ | वृथा पुष्ट ॥ लोक बहुत शोधावे । त्यांचे अधिकार जाणावे । जाणजाणोनि धरावे । जवळी दुरी ॥ अधिकारपरच्चें कार्य होतें । अधिकार नसतां व्यर्थ जातें । जाणून शोधावीं चित्तें । नानाप्रकारें ।।