पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. दीर्घ सूचना आधींच कळे । सावधपणें तर्क प्रवळे जाण जाणोनि वळे । यथायोग्य || । ऐसा जाणे जो समस्त । तोचि महंत बुद्धिवंत । या वेगळें अंतवंत । सकळ कांहीं ॥ तालवेळ तानमानें । प्रबंध कविता जाड वचनें । मजालसी नाना चिन्हें । सुचत जावीं ॥ जो एकांतास तत्पर । आधीं करी पाठांतर । अथवा शोधी अर्थातर | ग्रंथगर्भाचें ॥ आधींच शिकोन जो शिकवी । तोचि पावे श्रेष्ठ पदवी । गुंतल्या लोकांस उगवी । विवेकबळें ॥ अक्षर सुंदर वाचणें सुंदर | बोलणें सुंदर चालणें सुंदर । भक्तिज्ञान वैराग्य सुंदर । करूनि दावी ॥ जयास प्रयत्नचि आवडे । नाना प्रसंगी पवाडे । धीटपणें प्रगटे दडे । ऐसा नव्हे | सांकडींमध्ये वर्तो जाणे । उपाधीमध्ये मिळों जाणे । अलिप्तपणें राखों जाणे । आपणासी ॥ आहे तरी सर्वांठायीं । पाहों जातां कोठेंचि नाहीं । जैसा अंतरात्मा ठायींचा ठायीं । गुप्त जाहला ॥ त्या वेगळे कांहींच नसे । पाहों जातां तो न दिसे । न दिसोन वर्तवीतसे । प्राणी मात्रासीं ॥ तैसाचि हाहि नानापरी । बहुत जनांसी शाहणें करी । नानाविद्या त्या विवरी । स्थूळ सूक्ष्म ॥ आपणाकरितां शाहणे होती । ते सहजचि सोय धरिती । जाणतेपणाची महती । ऐसी असे ॥ राखों जाणें नीति न्याय । न करी न करवी अन्याय । कठिण प्रसंगी उपाय | करूं जाणे ॥ ऐसा पुरुष धारणेचा । तोचि आधार बहुतांचा । दास म्हणे रघुनाथाचा । गुण घ्यावा ॥