पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. जो निर्मळास ध्यायील । तो निर्मळाचे होईल । जो जयास भजेल | तो तद्रूप जाणावा || तिसरा समास व्यावहारिक उपदेशपर आहे. ') येथें नरदेहाचें महत्व सांगितले असून मनुष्यानें व्यवहारांत कसे वागावें हें दाखविले आहे. बहुतां जन्माचा शेवट । नरदेह सांपडे अवचट । येथें वर्तावें चोखट । नीतिन्यायें || प्रपंच करावा नेमक | पहावा परमार्थ विवेक । जेणें करितां उभय लोक । संतुष्ट होती ॥ तरी आतां ऐसें न करावें | बहुत विवेकें वर्तावें । इहलोक परत्र साधावे । दोहींकडे ॥ आळसाचें फळ रोकडें । जांभया देऊन निद्रा पडे । सुख म्हणोन आवडे । आळसी लोकां ।। साक्षेप करितां कटती । परंतु पुढे सुरवाडती । खाती जेवती सुखी होती । यत्नेंकरूनी ॥ ४३ • आळस उदास नागवणा | आळस प्रयत्न बुडवणा । 'आळसें करंटपणाच्या खुणा । प्रकट होती ॥ म्हणोन आळस नसावा । तरीच पाविजे वैभवा । अरत्रीं परत्रीं जीवा | समाधान | चवथ्या समासांत पुनः नेहमीच्या वेदांती पालुपदावर रामदास आले आहेत. पण शेवटीं तिसऱ्या समासाप्रमाणें विवेकानें वागण्याचा उपदेश केला आहे. पांचव्या व सहाव्या समासांत पुन्हां राजकारण हा शब्द आला आहे व राजकारण करणें हे मनुष्याच्या कर्तव्यापैकी एक कर्तव्य आहे असे म्हटले आहे व राजकारण करतांना कसे वागले पाहिजे कोणते धोरण स्वीकारलें पाहिजे याचें विवरण केले आहे. म्हणून हे दोन्ही समास बहु- तेक जसेच्या तसे येथे उतरून घेणे इष्ट आहे. तें एक हरिकथा निरूपण | दुसरें तें राजकारण | तिसरें तें सावधपण । सर्व विषयीं ॥