पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ सज्जनगड व समर्थ रामदास. प्रचीतिविण औषध घेणें । प्रचीत नसतां पथ्य करणें । प्रचीतिविण ज्ञान सांगणें । या नांव भ्रम ॥ ब्रह्मा लिहितो अदृष्टीं । आणि वाचून जाते सटी । ऐशा प्रकारांच्या गोष्टी या नांव भ्रम ॥ सातव्या समासांत ज्ञान्याच्या सामर्थ्याचें वर्णन केले आहे व ज्ञानी झाला तरी त्यानें सगुण भक्ति करण्यास व निष्काम कार्य करण्यास हरकत नाहीं असे प्रतिपादन केले आहे. आठव्या समासांत प्रचीतीचे स्वरूप सांगितले आहे व तसें करतांना सुद्धां व्यावहारिक दृष्टांत दिले आहेस. उदाहरणार्थ हा पहा:- D वैद्य पाहिला कच्चा । तरी प्राण गेला पोराचा | येथें उपाय दुसऱ्याचा । काय चाले ॥ स्वदुःखें अंतरीं झिजे | आणि वैद्य पुसतां लाजे । तरी मग तयासि साजे । आत्महत्यारेपण || नवव्या व दहाव्या समासांत पुनः नेहमीचा वेदांत, ब्रह्मापासून सृष्टी-- ची रचना व परब्रह्माचें स्वरूप यांचें वर्णन करून दशक संपविला आहे. अकराव्या दशकाच्या पहिल्या समासांत आकाशापासून वायु, वायूच्या जोराच्या घर्षणानें वन्हि व मंदवायुपासून पाणी व पाण्यापासून नाना बीज- रूप पृथ्वी व त्यापासून पदार्थमात्राची उत्पत्ति असा सृष्टिक्रम देऊन भ जग कल्पनामय आहे व ती परमात्म्याची कल्पना आहे व त्या पुरुषा- पासून पंचभूतात्मक व त्रिगुणात्मक अशी अष्टधाप्रकृति होते व त्यापासून सर्व जग होतें अशी विकल्पानें सृष्टिरचना सांगून मग उलटकमानें सृष्टी- चा नाश होतो व त्याला प्रारंभ सूर्य तापापासून होतो असे सांगितले आहे.) व त्यानंतर आत्म्याचे निरनिराळे प्रकार सांगून निर्गुण व निराकार पर मात्म्याच्या प्रतिपादनानें समासाची समाप्ति केली आहे. दुसऱ्या समासांत मायेच्या चंचलपणाचें वर्णन केले असून प्रतिमारूप देव; अवताररूप देव, अन्तरात्मरूपी देव व निर्विकार देव असे चार प्रकारचे देव वर्णिले आहेत व भावाप्रमाणें देव पावेल असे म्हटले आहे.