पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४४ सज्जनगड व समर्थ रामदास चौथा अत्यंत साक्षेप । फेडावे नाना आक्षेप । अन्याय थोर अथवा अल्प । क्षमा करीत जावे ॥ जाणावें पराचें अंतर । उदासीनता निरंतर । नीति न्यायास अंतर । पडोंच न द्यावें ॥ संकेतें लोक वेधावा । एकून एक बोधावा । प्रपंचहि सांवरावा । यथानुशक्त्या || प्रसंगसमय वोळखावा । धीर बहुत असावा । संबंध पडो न द्यावा । अति परिचयाचा ॥ उपाधीस विस्तारावें । उपाधत न सांपडावें । नीचत्व पहिले घ्यावें । आणि मूर्खपण || दोष देखोन झांकावे | अवगुण अखंड न बोलावे । दुर्जन सांपडोन सोडावे । परोपकार करूनी ॥ तऱ्हे भरोंच नये । सुचावे नाना उपाय | नव्हे तेंचि करावें कार्य । दीर्घ प्रयत्नें ।। फड नासोंच न द्यावा । पडिला प्रसंग सांवरावा । अतिवाद न करावा । कोणी एकासी ॥ दुसऱ्याचें अभीष्ट जाणावें । बहुतांचें बहुत सोसावें । न सोसे तरी जावें । दिगंतरासी ॥ दुःख दुसऱ्याचें जाणावें । ऐकोन तरी वाटोन ध्यावें । बरें वाईट सोसावें | समुदायाचें ॥ अपार असावें पाठांतर । सन्निध असावा विचार । सर्वदा सर्वतत्पर । परोपकारासी ॥ शांति धरून धरवावी । तऱ्हे सांडून सांडवावी । क्रिया करून करवावी । बहुतां करवीं ॥ करणे असला उपाय । तरी वोलोन दाखऊं नये । परस्परेंचि प्रत्यय । प्रचीतीस आणावा ॥. जो बहुतांचें सोसीना । त्यास बहुत लोक मिळेना । बहुत सोसितां उरेना । महत्त्व आपुलें ॥