पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. ४१ ह्मणोन जाणीव नेणीव मिश्रित । अवघें चालतें पंचभूत । ह्मणोनियां भूतांत । जाणीव असे ॥ कोठें दिसे कोठें न दिसे । परि तें भूतीं व्यापून असे । तीक्ष्ण बुद्धि करितां भासे । स्थूल सूक्ष्म ॥ सातव्या समासांत मनुष्याला जन्मकाळ कसा आला व निव्वळ मरणा- नें मनुष्य मुक्त होतो किंवा नाही याचा विवाद करून ज्ञानाशिवाय मोक्ष नाहीं असें रामदासांनीं प्रतिपादन केले आहे. आठ, नऊ व दहा या समासांत वायु, आकाश, परब्रह्म व ज्ञानी वगैरे वेदांत तत्त्वांचें पुन्हां विवरण करून दशक संपविला आहे. दहाव्या दशकाच्या पहिल्या समासांत सर्वत्रांचें अंतःकरण एक की अनेक हा प्रश्न काढून अंतःकरण म्हणजे जाणीव किंवा ज्ञान असें सांगून तें ज्ञान सर्वत्र कमी अधिक प्रमाणानें पण एकच आहे प्रतिपादन केलें आहे. दुसऱ्या तिसऱ्या, चंवथ्या व पांचव्या समासांत जगाची उत्पत्ति, स्थिति व लय करणारे ब्रह्मा, विष्णु, महेश यांचें वर्णन आहे; व तें कर- तांना ब्रह्मदेवानें सृष्टि इच्छामात्रेकरून कशी केली, त्यानें प्रत्येक जातीच्या प्राण्याचें जोडपें कसें निर्माण केले व त्या प्रत्येक जोडप्यापासून पुढे मग हजारों प्राणी कसे निर्माण झाले याची हकीगत दिली आहे व नंतर पांच प्रकारच्या प्रळयांची माहिती सांगितली आहे. साहाव्या समासांत भ्रमाचें स्वरूप पुष्कळ व्यावहारिक दृष्टांतांनी दाख- विले आहे व तसे करतांना समाजांतील पुष्कळ वेडगळ समजुर्ताचे दाखले दिले आहेत. दुश्चिन्ह अपशकुन | मिथ्या वार्तेनें भंगे मन । चचके पदार्थ देखोन । या नांव भ्रम || आतां जें जें देइजेते । तें तें पुढें पाविजेते । मेलें मनुष्य भोजना येतें । या नांव भ्रम ॥ मेलें माणूस स्वप्ना आलें । तेणें कांहीं मागितलें । मनीं अखंड बैसलें । या नांव भ्रम ॥