पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. चवथ्या समासांत मनुष्याच्या उत्तमाधम स्थितीचे कारण काय असा प्रश्न काढण्यांत आला आहे व त्याचें उत्तर ह्मणून विद्या, ज्ञान व जाणतेपण या कारणानें उत्तम अवस्था मनुष्य आपल्याला प्राप्त करून घेतो हें व्यावहा रिक व प्रवृत्तिपर तत्त्व मोठ्या मार्मिकतेने सांगितले आहे. येथें राम- दासाच्या उपदेशाची नवी छूटा दृग्गोचर होते. याच समासांत प्रथमतः राजकारण शब्द आला आहे. ४० नेणतां कांहीं राजकारण | अपमान करूनि घेति प्राण । नेणतां कठिण वर्तमान । समस्तांस होय || समासांत नेहमींचा वेदांती उपदेश टाकला आहे अशांतला भाग नाहीं कारण तोही उपदेश या समासांतसुद्धा आहे. पांचव्या समासांत ' पिंडीं तें ब्रह्मांडीं' या तात्त्विक म्हणीचा अर्थ काय व या म्हणींत किती तथ्यांश आहे याचा निर्णय केला आहे. सहाव्या समासाचे प्रारंभी ज्ञानदशकाचा स्पष्ट उल्लेख आहे. यावरून पहिला सात दशकांचा दासबोध पुरा झाल्यावर आठवा दशक ज्ञानदशक म्हणून लहानशा निबंधाप्रमाणे स्वतंत्र केलेला असावा. ह्मणून दास- बोधांत त्याचा मागे पुढे असा दुहेरी उल्लेख सांपडतो. या समासांत ब्रह्मा- पासून मूळमाया मूळमायेपासून गुणमाया - गुणमायेपासून त्रिगुण, त्रिगुणां- पासून वायु, वायूपासून तेज, तेजापासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी असा महाभूतांचा उत्पत्तिक्रम सांगितला आहे. मात्र आकाश हैं गुणांपासून होत नाहीं तर निरुपाधि आकाश म्हणजेच ब्रह्म व उपाधिसहित ब्रह्म तेंच आकाश असें तत्त्व प्रतिपादन केले आहे. उपाधीमध्यें सांपडलें । सूक्ष्म पाहतां भासलें । इतुक्यासाठी आकाश झालें । भूतरूप ॥ भूतांत जाणीव किंवा ज्ञान केव्हां दृग्गोचर होतें असाही प्रश्न येथें केला आहे व जाणीव वायूचेंच लक्षण आहे असे सांगितले आहे. जाणीव ह्मणजे जाणते चळण । तेंचि वायूचें लक्षण । वायुअंगीं सकल गुण । मागां निरूपिले ॥