पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. वर्णन आहे. यांत अद्वैतवेदांताची संस्कृतांतील सर्व मतें प्रतिपादन केलेली आहेत. यांत जातिभेदाचें गौणत्व दाखविले आहे; देवापुढे सर्व मनुष्यें सारखींच आहेत; देवाला भक्त प्रिय आहेत; असें सांगितले आहे. यांत ज्ञान व भक्ति यांचा विरोध नाहींसा करून दोहोंची सांगड घाल- ण्याचा प्रयत्न इतर कवींप्रमाणेच केलेला आहे. सारांश आतांपर्यंतच्या दासबोधांतील उपदेशांत व इतर साधुसंतांच्या उपदेशांत मुळींच फरक नाहीं असें म्हणणें प्राप्त आहे. व म्हणूनच इतक्या भागावरून पाहतां रामदास व महाराष्ट्रांतील इतर साधुसंत यांच्यामध्ये जमीनअस्मानाचें अंतर आहे असे जें कांहीं लोक म्हणतात त्यांत अर्थ नाहीं हें स्पष्ट होत आहे. व कै. माधवरावजी रानडे म्हणतात त्याप्रमाणे सर्व महाराष्ट्रीय साधु- संतांचा उपदेश धार्मिक व सामाजिकच होता; तो प्रत्यक्ष राजकीय नव्हता तरी पण त्या उपदेशाचा जनमनावर अप्रत्यक्षपणे परिणाम होऊन समा- जांतील व्यक्तींमध्ये एकोपा व एक प्रकारची राष्ट्रीय भावना उद्भू होऊं लागली; सारांश महाराष्ट्रांतील मराठ्यांची त्या उपदेशानें मनोभूमि नांगरून पेरणीस तयार झाली होती व म्हणूनच शिवाजीमहाराजांच्या राजकीय खटाटोपास इतक्या लवकर स्वरूप आलें. यावरून कांहीं इतिहासभक्त म्हणतात त्याप्रमाणे ज्ञानेश्वरादि साधु- संतांनीं व टाळकुट्यांनी समाजांत नेभळटपणा वाढविला, त्यांनी क्षात्रतेज कमी केले व त्यांच्या उपदेशानें शिवाजीच्या कार्यास मदत होण्याऐवज उलट अडथळा झाला हें जर खरें असेल तर हे सर्व आक्षेप रामदासांच्या निद्दान आतांपर्यंतच्या उपदेशालाही लागू आहेत असे म्हणणें प्राप्त आहे. रामदासांच्या दासबोधांतील पुढील भागाचा सारांश व त्यावरून निघणारी अनुमानें यांच्या विचारास आतां लागू.