Jump to content

पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सज्जनगड व समर्थ रामदास.

३५


 तेथें निरूपिलें बरवें । पार्वतीप्रति सदाशिवें ।
 याकारणें सद्भावें । सद्गुरुचरण सेवावे ||

 जो ये ग्रंथींचा विवेक । विवंचून पाहे साधक
 तयास सांपडे एक । निश्चय ज्ञानाचा ॥

 ज्या ग्रंथीं बोलिलें अद्वैत । तो म्हणूं नये प्राकृत ||
  सत्य जाणावा वेदांत । अर्थाविषयीं ।।
 प्राकृतें वेदांत कळे । सकळ शास्त्री पाहतां मिळे ।
 आणि समाधान निवळे | अंतर्यामीं ॥
 तें प्राकृत म्हणो नये । तेथें ज्ञानाचा उपाय |
 मूर्खास हें कळे काय । मर्कटा नारिकेल जैसें ॥

 आतां असो हें बोलणें । अधिकारपरत्वें घेणें । 

 शिंपीमधील मुक्त उणें । म्हणों नये ॥
 जेथें नेतिनेति श्रुति । तेथें न चले भाषाव्युत्पत्ति ।
 परब्रह्म आदि अंतीं । अनिर्वाच्य ॥
 हा शेवटचा उतारा अगदीं स्पष्ट आहे. यावरून रामदासांनी प्रथमतः येवढाच दासबोध लिहिला असावा व पुढचा भाग पुढे मागाहून लिहिला असावा ही गोष्ट निर्विवाद आहे. तसेंच सात दशकांचा जो थोडक्यांत सारांश दिला आहे व रामदासांचे विचार त्यांच्याच शब्दांनी सांगितले आहेत त्यांवरून त्यांच्या ग्रंथामध्यें एक व्यवस्थित विचारसरणी दिसते. तुकारामाच्याप्रमाणें त्यांचा ग्रंथ केवळ स्फुट काव्यमय नाहीं. आतांपर्यंत 'दिलेल्या विचारांच्या धोरणाविषयीही शंका राहणार नाहीं असें वाटतें.. या सर्व उपदेशामध्ये राजकीय व्यावहारिक किंवा सांसारिक उपदेशाचा मागमूसही नाहीं. हा उपदेश म्हणजे ज्ञानेश्वरापासून सर्व साधुसंतांनीं व कवींनीं केलेलाच वेदांतपर निवृत्तिपर व भक्तिपर उपदेश आहे. इतर साधु- संतांप्रमाणें हा उपदेश प्राकृतांत केलेला आहे व प्राकृतांत केल्यामुळे त्याची योग्यता कमी होत नाहीं असे इतर कवींप्रमाणेंच रामदासांनी प्राकृताचे समर्थन केलें आहे. यांत निवळ कर्ममार्ग मूर्तिपूजा व व्रतवैकल्ये यांचेवर तडाके मारले आहेत. यांत संसाराच्या दुःखमयत्याबद्दल इतर कवींप्रमाणें