Jump to content

पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. सज्जनगड व समर्थ रामदास. ३७ सा त दशकरूपी दासबोध पुरा झाल्यावर कांहीं काळानें रामदासांनी पुन्हां लिहिण्यास सुरवात केली व हा आठवा दशक स्वतंत्रपणे लिहिला असावा असे त्याच्या प्रारंभींच्या नमनावरून दिसतें. या दशकांत प्रथम समासांत देवाचें स्वरूप सांगितले आहे. ज्यानें चंद्र सूर्यादि तारे केले; ज्यानें सर्व प्राणिमात्र निर्माण केलें, ज्यानें स्वर्ग पृथ्वी पाताळ हे तीन्ही लोक घडविले; सारांश ज्याने सर्व चराचर जग केले तोच खरा देव होय; त्याला जन्म मरण नाहीं; त्याला विकार नाहीं; तो जगापासून वेगळा आहे व म्हणूनच मूर्तिपूजा करणें, मूर्तीलाच देव समजणें हा अविवेक होय असें रामदास सांगतात. दुसऱ्या व तिसऱ्या समासांत मायेचें व तिच्या निरनिराळ्या स्वरूपांचें वर्णन आहे. चवथ्या व पांचव्या समासांत मायेपासून सत्व रज तम हे गुण कसे होतात हे सांगितले आहे व तमा- पासून सूक्ष्म पंचतवें कशीं निर्माण होतात याचें विवेचन केले आहे. व या सूक्ष्म तत्त्वांची स्थूल स्वरूप व त्यांपासून होणारे प्रत्यक्ष पदार्थ यांचें निदर्शन केलें आहे. साहाव्या समासांत मोक्ष कोणाला व कसा मिळेल याचें विवेचन केलें आहे व तें करतांना दुश्चित्तता व आळशीपणा यांचें व्यावहारिक उपदेश- पर विवरण केले आहे. 6 आतां असो हें वोलणें । घात होतो दुश्चितपणें । दुश्चितपणाचेनि गुणें । प्रपंच ना परमार्थ ।। दुश्चितपणें कार्य नासे । दुश्चितपणें चिंता वसे । दुश्चितपणें स्मरण नसे । क्षण एक पाहतां ।। दुश्चितपणा पासून सुटला । तरी तो सवेंचि आळस आला । आळसा हाती प्राणियाला । उसंतचि नाहीं ॥ आळसें राहिला विचार । आळसें बुडाला आचार | आळसे नव्हे पाठांतर । कांहीं केल्या ॥