पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
'सज्जनगड व समर्थ रामदास.

१७


याची खोली, त्यांचा मच्छरदाणीसकट पितळी छप्परपलंग पाहिला. तो लांबीला थोडा कमी भासला, पण रामदासस्वामी त्या पलंगावर निजत नसत तर तेथेंच घातलेल्या विटांच्या ओट्यावर निजत असत असें आम्हांस कळलें, स्वामींची गुप्ती असलेली लांब कुबडी, त्यांची उंच वेताची काठी, त्यांची पाण्याची कळशी, तांच्या, भांडे, पळीपंचपात्री वगैरे सर्व जिनसा आम्ही पाहिल्या. श्रीसमर्थांच्या हयातीतील व त्यांनीं वापरलेल्या जिनसा जितक्या श्रद्धेनें व भक्तिभावानें येथें ठेवण्यांत आल्या आहेत, तितक्या श्रद्धेनें व भक्तिभावानें महाराष्ट्रांतील इतर पूर्वकालीन थोर पुरुषांच्या जिनसा ठेवण्यांत आल्या असत्या तर हल्लींच्या पिढीला त्यांचा बराच उपयोग झाला असता असें माझ्या मनांत आलें. पण परळी हें गांव व हैं ठिकाण रामदासांना इनाम असून त्यांच्या ज्येष्ठ बंधूंच्या वंशाकडे म्हणजे चाफळकर सरदारांकडे हें इनाम सारखें चालत आल्यामुळे अशा जिनसा व वस्तु राहू शकल्या. इतर थोर पुरुषांच्या बाबतींत अशा तऱ्हेची वंशपरंपरा चालली नसेल म्हणून वस्तु शिल्लक राहिल्या नसतील असें मला वाटलें. इतकें पाहून होत आहे तो साडेसहांचा सुमार होऊन अंधार पडूं लागला म्हणून आम्हांला परतावें लागलें. परत येतांना आम्हांला एक गबाळे पोषाख केलेले गृहस्थ उतरतांना दिसले ते व आम्ही पहिल्या दरवाज्याशी आलो. आमचे जवळ दुर्बीण होती ती त्यांनीं मागितली व तींतून दरवाजावरील शिलालेख पाहूं लागले. आम्हीं जातांना तो लेख पाईला होता व त्यावर परनि अक्षरे आहेत पण थोऊ असें स्पष्ट दिसत होतें. दुर्वाणीने पाहून ते गृहस्थ आह्मांला विचारू लागले, " तुम्हांला या लेखांत ' वंदे मातरं ' ही अक्षरें दिसत नाहींत ? मला तर तीं स्पष्ट दिसतात. "
 आपल्या काळीं कवन झालेल्या बंकिमचंद्राच्या वंदे मातरं ' या पद्यांतील अक्षरें परळीच्या शिळापटावर या गृहस्थांना दिसतात हें पाहून त्यांच्या सुलभश्रद्धस्वभावाबद्दल मला कींव आली व डिकिन्सच्या 'पिक- विक पेपर्स'मधल्या एका प्रसंगाची आठवण झाली. असो.
 दुसऱ्या खेपेस आम्हीं परळीचा किल्ला पाहिला त्या वेळीं आम्हीं पर-
स... २