पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८

सज्जनगड व समर्थ रामदास.

ळीगांवाकडून गेलों. इकडून रस्ता थोडा विकट आहे हें वर सांगितलेंच आहे. परळी हें गांव रामदासांच्या वंशजांना इनाम आहे. येथेंही एक राममंदिर आहे. त्यांत विशेष पाहण्यासारखें कांहीं नाहीं. पण येथें दोन • हेमाडपंती जुनीं देवळें आहेत त्यांचें काम मात्र पाहण्यासारखे आहे. त्यां- 'पैकीं एक देऊळ मोडलेंच आहे. दोन्हीही देवळें महादेवाचींच आहेत, त्यांना तेथले लोक विरूपाक्षाचें देऊळ ह्मणतात. दुसरें देऊळ चांगलें शाबूत आहे. ह्रीं देवळें पूर्वाभिमुख आहेत. देवळाला गाभारा व सभामंडप आहे. सभामंडप चोवीस फूट औरस चौरस आहे. व खांबांच्या चार चार ओळी आहेत. खांबांचें नक्षीकाम अप्रतिम आहे. या खांबांनी जे लहान लहान चौक पडले आहेत त्यांवर कोपऱ्या कोपऱ्यानें चार पाटथरें टाकून त्याची तक्तपोशी केली आहे. मंडपाच्या मुख्य दरवाजावरही पुष्कळच नक्षी आहे. मंडपाला लागून थोडीशी चिंचोळी जागा असून त्याचे पुढें देवाचा गाभारा आहे. गाभाऱ्याचा दरवाजाही चांगल्या कोरलेल्या दग- डाचा आहे. देवळासमोर एक दीपमाळ आहे. ती मोठमोठ्या अखंड दगडांची केलेली आहे. या देवळांचें काम खरोखरीच आश्चर्य करण्या- सारखें आहे; मला हीं देवळें पाहून ग्वालेरच्या किल्लयांतील सासबाहु नांवाच्या देवळांची आठवण झाली. ग्वालेरच्या किल्ल्यांतील देवळें याहून मोठीं आहेत व ती या देवळांपेक्षां जास्त चांगल्या स्थितीत आहेत. पण हीं देवळें हेमाडपंती पद्धतीचे उत्तम मासले आहेत यांत कांहींएक शंका नाहीं. पण या देवळांत एक गोम आहे अझून सांगायची आहे. गोम मात्र पठाडी आहे. यामुळे इतकी सुंदर देवळें अदरा झालीं आहेत. या देवळांतील उत्तम नक्षीच्या कामावरोवर या ठिकाणीं अश्लील वीभत्स अशीं पुष्कळ चित्रे आहेत व हीं चित्रे पुढच्या दरवाजाच्या बाजूस जे मोठमोठे एकसंध दगड बसविलेले आहेत त्यांवर आहेत, तसेंच गाभान्याच्या दरवाजावरही आहेत. इतक्या सुंदर नक्षीच्या महादेवाच्या देवळांत अशी चित्रे कोठून आलीं असा प्रश्न माझ्या मनांत उभा राहिला. मी आजपर्यंत बुद्धकालीन व तदनंतरच्या दगडी इमारती व देवळें पुष्कळ पाहिलीं पण अशा प्रकारचीं बीभत्स व अश्लील चित्रे पाहिलीं नव्हती.